हारानाळा शिवारात ६१ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने कुंटूर पोलिसांची निष्क्रियता उघड - NNL



नायगाव/ नांदेड|
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत हारनाळा येथे पोलिसांनी छापा घालून ३८जिवंत झाडे ६१ किलो गांजा पकडला असून याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमूळे पून्हा एकदा कुंटूर पोलिसांची निष्क्रियता दिसून आली आहे.


याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना गुप्त खबर्‍यांकडून विश्वसनीय माहिती मिळाली की,राहेर हारनाळा शिवारात गांजाची वांग्याचा झाडांमध्ये ३८ गांजाचे झाडे आढळून आले असता त्यांनी सापळा रचून गांजाचे झाडे जप्त करण्यात आले आहे. एल.सी.बि.पोलीस उपनिरीक्षक संचिन सोनवने यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिलेल्या आरोपी बळीराम गंगाराम घोरपडे रा.हारनाळा यांनी आपल्या शेतात वांग्याचा शेती मधे ३८ झाडे मध्ये ठिकाणाहून मिळालेल्या मालाप्रमाणे तिन लाख ९हजार ६५०रुये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.


राहेर येथील शेतकऱ्यांने हरनाळा शिवारातील वांग्याच्या शेतीत गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी कारवाई करत गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेवून ६२ किलो वजनाच्या गांज्याची झाडे जप्त केली आहे. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती पोलीस उप निरिक्षक सचिन सोनवणे यांनी दिली आहे. नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे यांचे बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरनाळा परिसरात असलेल्या गट नंबर ३६ मधील शेतात वांग्याचे पिक घेतले पण या वांग्याच्या पिकात गांज्याच्या झाडाची लागवड केली.


सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने (आज दि.२२) रोजी सकाळी हरनाळा शिवारातील शेतात धाड मारली.यावेळी वांग्याच्या पिकात कुठलीही परवानगी न घेता गांज्याची ३८ झाडे लावल्याचे दिसून आले. यावेळी गांज्याच्या झाडांची लागवड करणारे बळीराम घोरपडे यांना अगोदर ताब्यात घेतले व बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन ३ लाख ९६ रुपये काही किंमतीचे ६१ किलो वजनाची ३८ गांज्याची झाडे जप्त करण्यात आली. घोरपडे हा गांजाची नशा करणारा शेतकरी असून तो शेतातच गांजाचे उत्पादन घेतो आणि ही बाब कुंटूर पोलीसांसह परिसरातील अनेकांना माहीत आहे पण आजपर्यंत कुणीही कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली.


सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेका जमादार दशरथ जाभळीकर,मारोती करले, तेंलग,रणधीर राजवंशी, मोतीराम पवार,विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण अदिंचा सहभाग असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक सोनवणे यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध्द धंदे राजरोसपणे सुरु आहेत मात्र ठाणेदारांसह ठाण्यातील गोपनीय शाखा व कर्मचारी वर्गाला स्वतःच्या आर्थिक हितासाठी कर्तव्याचा विसर पडला असला तरिही वरिष्ठस्तरावरुन वेळोवेळी कारवाया होत असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे सोबतच, ठाणेदारासह बिट जमादार व ठाण्याच्या गोपनीय शाखा कर्मचाऱ्यांवरही प्रकरणनिहाय दोषी ठरवून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी