हिमायतनगर| जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक गैरहजर राहत आहेत. शासनाने शाळा सुरू केले नाहीत पण शिक्षकांनी शाळा सुरू झालेले असताना सुद्धा तालुक्यातील मौजे जिरोणा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक हजार न राहत शाळेला दांडी मारत आहेत. याबाबतची तक्रार एका पालकाने गटविकास अधिकार्यांसह गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे जिरनो येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चक्रधर हे शाळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी टीसीची अत्यंत आवश्यकता पडत आहे. त्याच कामाकरता गेले असता टीसी काढण्यासाठी चक्र माराव्या लागत आहेत. चार दिवस शाळेवर गेले तर मुख्याध्यापक हजार राहत नाहीत. अश्यावेळी मुख्याध्यापकास फोनवर संपर्क केला तर उलट सुलट भाषा बोलून मला तेच काम आहे का..? असे उलट सुलट म्हणून टाळाटाळ करत आहेत.
मी माझ्या मर्जीनुसार आल्यानंतर तुमच्या मुलीची टीसी देतो अशी उर्मट भाषा वापरत आहेत. जर मुख्याध्यापकाला शाळेत न येता राजकारणच करायचे असेल तर त्यांना नोकरीवरून काढण्यात यावे. आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करून माझ्यासह इतर पाल्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती द्यावी. अशी मागणी जिरोना येथील बालाजी मुकुंदराव कदम या पित्याने गट शिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
याबाबतचे निवेदन गटशिक्षणाधिकारी कार्यालय देण्यासाठी गेले असता तेथेही कोणीच उपस्थित नव्हते त्यामुळे दोन-तीन तास ताटकळत थांबावे लागले. असा आरोपही तक्रारकर्ते बालाजी मुकुंदराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. शिक्षण विभागाचे मुख्य अधिकारी जर उपस्थित राहत नसतील तर शाळेवरील मुख्याध्यापक शिक्षक काय ड्युटी करणार..? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यात शिक्षण विभागाकडून चालत असलेल्या खेळखंडोबा थांबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.