पावसाळा तोंडावर बळीराजा तळपत्या उन्हात मशागतीत मग्न -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
मृग नक्षत्र अवघ्या १२ दिवसावर एवुन ठेपल्याने बळीराजा अंग झटकून शेती कामाला लागला आहे. दरम्यान में महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता अधिकच वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने मशागतीची कामे करताना शेतकरी, शेतमजुरांच्या नाके नऊ येत आहेत.  

गत वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी - अधिक झाल्याने यंदा शेतकर्‍यांना रबी हंगाममात म्हणावे तसे उत्पन्न घेता आले नाही. त्यातच कोरोना महामारी आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटाने शेतकर्यांना अडचणीत आणले आहे. त्यावर मात करत मोठय़ा हिमतीने खरीप हंगाम घेण्यासाठी बळीराजा पेरणी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. सध्या स्थितीत शेतात नांगरटी, वखरटी, पंजी, रोटाव्हेटर, कचरा वेचणी करून जमीन सुपीक करणे आदी कामात गुंतला आहे. पावसाचे पाणी जमितीच झिरपावे यासाठी जमिनीचे लेव्हल करून बांध टाकण्याच्या कामांना वेग आला आहे. 

बहुतांश शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाल्याने अनेक कामे यंत्राच्या साहाय्याने करावी लागत असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रैक्टरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती करणे तारेवरची कसरत झाली आहे. खरीप हंगामपूर्व कामे सुरु असताना उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने शेतकरी पहाटेच्या प्रहरी कामात गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारी १० नंतर उन वाढत असल्याने कामे बंद करून विश्रांती घ्यावी लागत आहे. उन्हाची तीव्रता कमी होताच पुन्हा सायंकाळी ५ नंतर कामाला सुरुवात करून अंधार होईपर्यंत कामात गुंतल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. 

रोहिणी नक्षत्र सुरु झाले असून, रोहिण्या बरसल्या नाही. मात्र दिवसातून आभाळात ढगांचे वातावरण निर्माण होत असले तरी काही भागात तुरळक प्रमाणात पावसाचे थेम्ब बरसल्याने रोहीण्याचे आगमन होईल कि नाही..? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवामान खाते वेळेवर पाऊस सुरु होणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्यांना आगामी खरीप हंगाम बाबतची चिंता आत्तापासून सतावत आहे. त्यामुळे यावर्षी मोठा पाऊस होईपर्यंत पेरणीच्या कामाला लागणार नाही असे अनेक शेतकरी उघडपणे बोलून दाखवीत आहेत.

बी बियाण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली असून, कृषी दुकानात खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यंदा कोरिना महामारीमुळे सर्वजण ट्रस्ट असताना खताच्या किमतीची होत असलेली चड-उतार शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीत टाकणारी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आला असून, अगोदरच कंबरडे मोडलेले आणि आता हि परिस्थिती यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.



  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी