NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

मंगलवार, 28 जुलाई 2020

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल

संशयित आरोपीला सिंदखेड पोलिसांनी केली अटक

माहूर| मदनापुर येथून जवळच असलेल्या पडसा येथे मागील काही दिवसापासून लग्नाचे खोटे आमिष देऊन जबरी संभोग करणार्‍या तरुणावर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील पडसा येथील आरोपी इम्रान नवाब शेख वय (२६) वर्ष हा मागील अनेक दिवसांपासून येथीलच एका २२ वर्षीय मुलीला लग्नाचे खोटे आमिष देऊन सातत्याने जबरदस्तीने अत्याचार करत होता. मुलीने लग्न संदर्भात वारंवार मागणी केली असता खोटे आमिष व बनावट गोष्टी करून वेळ मारून नेत होता. मुलीच्या इच्छेविरुद्ध अमानुषपणे अत्याचार करण्याचा प्रकार नित्याचीच बाब बनली होती. नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून व सदर आरोपी लग्न करण्याच्या मानसिकतेत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने सिंदखेड पोलीस ठाण्यात दि.25 रोजी रितसर फिर्याद देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून सिंदखेड पोलीस ठाण्यात जबरदस्तीने अटायचार करणे व भारतीय दंड विधानाच्या इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून, आरोपी इम्रान यास सिंदखेड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणताच प्रश्न निर्माण नसल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व या प्रकरणाचे तपास अधिकारी मल्हार शिवरकर यांनी दिली आहे.

....अजय कोगूरवार, माहूर, जी.नांदेड. 

कोई टिप्पणी नहीं:

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com