धर्मांतराचा प्रयंत्न

धर्मांतराचा प्रयंत्न हाणून पाडला 
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)दोन अल्पवयीन मुलामुलींना धर्मांतर करणाऱ्या मुस्लिमांच्या तावडीतून सदर मुलीला शिवसैनिकांनी सोडविले असून, तिचा सात वर्षाचा भाऊ याला मुस्लिम आरोपीने निजामबाद येथे पळविले आहे. संबंधितावर कार्यवाही करुन सदर मुलाचीही सुटका करावी, अशी मागणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्याकडे शिवसेनेचे सुशिल चव्हाण,  नगरसेविका श्रध्दा चव्हाण, भा.ग.देशपांडे केली आहे.

नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचे जाळे जोमाने पसरत आहे. हिंदू, दलित मुलींना कुठले तरी आमिष दाखवून त्यांच्या भोळेपणाचा फायदा नांदेड येथील काही मुस्लिम टोळके घेत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी महाविद्यालयीन मुलींना गाठून त्यांना लव्ह जिहादचे धडे देणारे अनेक प्रकरणे नांदेड शहरात शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. काल दि.27 जानेवारीच्या रात्री सातच्या सुमारास शहरातील नंदीग्राम सोसायटीमध्ये राहणारी एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी रडत रस्त्याच्याकडेला बसली होती. यावेळी शिवसेनेचे सुशिलकुमार चव्हाण यांना हे निदर्शनास आले. यावेळी चव्हाण हे सदर मुलीजवळ गेले असता या मुलीने मी बुध्दीस्ट आहे, परंतु मला मुस्लिम धर्म स्विकार असे माझ्या मोठ्या बहिणीचे पती म्हणत आहेत. सदर मुलीच्या बहिणीने मुस्लिमासोबत विवाह केला आहे. सदर बारा वर्षाची मुलगी व तिचा एक सात वर्षाचा भाऊ या दोघांनाही मुस्लिम धर्म स्विकार असा तगादा लावल्या जात होता. अखेर या सात वर्षीय मुलाला निजामबाद येथे पळविण्यात आलेले आहे. सदर मुलगी ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय कबाडे, तानाजी चिखले, तहसीलदार यांना कळविण्यात आली. आज सकाळी सदर मुलीला घेवून नगरसेविका श्रध्दा चव्हाण, सुशिल चव्हाण व आदी शिवसैनिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासमोर उभे करुन पिडीत मुलीच्या तोंडून वदवून घेण्यात आली. प्रकार गंभीर असल्याने सदर मुलीचा जबाब महिला सहाय्य कक्षामार्फत घेवून तिला बालसुधार गृहात पाठविण्यात आले. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अशोक उमरेकर यांनीही पिडीत मुलीची भेट घेतली.
खाजगी महिलेची दादागिरी 
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षातील प्रमुख महिलेचे पिडीत व गरजू महिलांना मदत करणे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून एका खाजगी संस्थेने सदर  महिलेची नेमणूक केली आहे. परंतु अशा प्रकरणामुळे आमचा वेळ वाया जातो, कार्यालयाची शिस्त तुम्हाला माहित नाही का? असा उफराटा सवाल तिने पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या मंडळींना केला. यावेळी पत्रकारांनाही तिने अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून सदर महिलेला समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी