हिमायतनगर येथे जवखेडा दलित हत्याकांड निषेधार्थ धरणे
हिमायतनगर(वार्ताहर)अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा (खालसा)येथे दलित कुटुंबवर जातीयवादी गावगुंडांनी हल्ला करून तिघांची निर्घुर्ण हत्या केली. हि घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, या हत्याकांडातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून फासावर लटकावे या मागणीसाठी हिमायतनगर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर तहसीलदार शरद झाडके यांना मागण्याचे निवेदन सोपवून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी डॉ. रविराज दुधकावडे, डी.डी.वाघमारे, नागसेन गोखले, पांडुरंग दुधाडे, भगवान भालेराव, चित्रहार लोकरे, गोविंद गोखले, गंगाधर वाघमारे, सुभाष गुंडेकर, धोंडोपंत बनसोडे, मारोती वाडेकर, राहुल हनवते, धम्मपाल कांबळे, गंगाधर गोखले, बबन हनवते, नामदेव कांबळे, रवि राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.