अवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी

नूतन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांची कर्मचार्यासह अवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी

*पहिल्याच दिवशी १७०० रुपयाचा वाहनधारकाकडून दंड वसूल.
*तिघा मद्यपिवर केली कार्यवाही
*वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर विशेस भर 


लोहा(ज्ञानोबा नागरगोजे)लोहा शहरातील अवैध धंदे,अवैध वाहतूक तसेच पोलिस कर्मचार्यांना शिस्त लावण्याची किमया फक्त एका दिवसात साधली ती लोह्याचे नूतन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी `दबंग` गिरीचा पोलिस अधिकारी म्हणून एका दिवसात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा लोहा वाशियांच्या मनावर उमठवला.

आपल्या २७ वर्षाचा पोलिस सेवेमध्ये सदैव वादग्रस्त ठरलेले गौतम यांनी यापूर्वी औरंगाबाद , अमरावती ग्रामीण, व तदनंतर नांदेड मधील भाग्यनगर ठाण्यामध्ये आपल्या दबंग गिरीचे अनोखे कारनामे दाखवून अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणून सोडले होते.तर सर्वसामान्याचे जीवन आनंद मय केले होते त्यामुळे अल्पावधीत ते सर्वसामान्याच्या गळ्यातील ताईत ठरले होते. त्याच दबंग गिरीचा अधिकारी लोह्यात अवतरला दि.३ रोजी रात्री ८:३० वाजता आणि लोहा शहरातील व पोलिस ठाण्यातील चित्र बदलण्यास सुरुवार झाली.रात्री १२:३० वाजता पहिली कार्यवाही सुरुवात झाली दारू ढोसून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तिघांना त्यांनी आपला पोलिसी हिसका दाखविला व त्यांच्यावर कार्यवाही केली.दि.४ मार्च रोजी लोहा शहरातील अवैध वाहतुकीकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला अवैध वाहतूक, अवैध धंदे, क्षमते पेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही चे सत्र आरंभिले दिवसभरात जवळपास १७०० रुपयाचा दंड त्यांनी वसूल केला.

त्यापूर्वी ठाण्यातील अंतर्गत शिस्त सुधारण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. कर्मचार्याचे वेळापत्रक, गणवेश, डोक्यावर सदैव टोपी, रजा, साप्ताहिक रजा, महिला पोलिसांना गणवेश अत्यावश्यक,ठाण्यात हजर होण्याची वेळ,आदि बाबी हेरून त्यांनी यामध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचार्यांना आदेशित केले. त्यामुळे इतके दिवस बिनधास्त राहणाऱ्या पोलिसांना आता काही दिवस बदल अंगवळणी आणण्यासाठी वेळ लागणार आहे. तर लोहा ठाण्यात सर्वच पोलिस कर्मचारी गणवेषामध्ये व शिस्ती मध्ये दिसून आले.यापुढे लोहा शहरातील मटका, अवैध धंदे, अवैध वाहतूक, रस्त्याच्या शेजारी थांबणारे व वाहतुकीला अडथळा ठरणारे वाहने व हातगाडे तसेच दुकानासमोरील अस्ताव्यस्त पडलेले समान त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक अनेक तास खोळंबण्याचे प्रकार होत होते. त्याकडे पोलिस निरीक्षकांनी आल्याबरोबर लक्ष केंद्रित केले आहे. लोहा शहरातील शाळा तसेच कॉलेज पारीशरात मध्यंतर तसेच सुट्टीच्या वेळेत मुलीच्या छेडछाडी संधर्भात पोलिसाची विशेस गस्त घालण्यात येणार असल्याची माहिती दबंग पोलिस अधिकारी अनिलसिंह गौतम यांनी नांदेड न्यूज लाइव्ह शी बोलताना दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी