डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या पुनर्विस्तारात श्रीकांत जाधव कबनुरकर यांची राज्य सरचिटणीसपदी बढती -NNL


नांदेड।
गेली अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीतील अग्रगण्य नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे श्रीकांत जाधव कबनुरकर यांची डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्विस्तारात राज्य सरचिटणीस पदी बढती करण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील कोणताही विषय असो जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय तिथे श्रीकांत जाधव कायम पुढे असायचे त्यांच्या याच स्वभावगुणामुळे अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीत आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.. श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी यापुढील काळात या पदाचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या संदर्भात जसे की 1) पटसंख्या अभावी मराठी शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण रद्द करण्यात यावे. 2) 2017 ची अर्धवट शिक्षक भरती पूर्ण करण्यात यावी. 3) दुसरी अभियोग्यता चाचणीचे तात्काळ आयोजन करणे. 4) शिक्षणसेवक मानधनवाढ. 5) विनाअनुदानीत शिक्षकांना प्रचलित धोरण लागू करावे.6) जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

7) CHB धारकांना प्रती तासिका 1000 रुपये मानधनवाढ देण्यात यावी. 8) कला, क्रिडा, कार्यानुभव निदर्शकांना कायमस्वरूपी, पूर्णवेळ तात्काळ सेवेत सामावून घ्यावे. 9) 2088 पदाची प्राध्यापक भरती तात्काळ करण्यात यावी. 10) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रशिक्षित व पात्रता धारक शिक्षकांना नेमणुका देण्यात याव्यात. असे विविध विषय निकाली काढण्यासाठी करणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले..त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी