नांदेड। ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकातला रविवार दि.२३ ऑक्टोबर रोजी सर्वात रोमांचकारी असणारा भारत पाकिस्तान हा सामना नांदेडकरांना मोठ्या पडद्यावर पहात स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा भाजप महानगर नांदेड व कलामंदिर ट्रस्ट तर्फे करण्यात आली असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी दिली आहे.
१९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात. २००७ आणि २०११ मध्ये भारताने विश्वकप जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते. यावर्षी रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कलामंदिर नांदेड येथे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या सामन्याच्या प्रसारणाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून नांदेडभूषण डॉ. हंसराज वैद्य, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख, डॉ. संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, ॲड. चैतन्यबापू देशमुख, अजयसिंह बिसेन, मिलिंद देशमुख, महेश खोमणे ,जनार्दन ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. कलामंदिर मध्ये आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.दिलीप ठाकूर व कामगार आघाडीचे सुरेश लोट यांनी केले आहे.