लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या तीन पदाधिकाऱ्यांना विविध पुरस्कार -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


नांदेड|
लायन्स प्रांत ३२३४ एच मध्ये २०२१-२२ या वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर ,डॉ.विजय भारतीया व शिवा शिंदे या लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या तीन पदाधिकाऱ्यांना विविध पुरस्कार मिळाले. 

लायन्स प्रांत ३२३४ मध्ये एकूण ८३ क्लब  आहेत. सिल्वासा गुजरात येथील खानवेल रिसोर्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये  बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी   लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी, प्रथम उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, द्वितीय उपप्रांतपाल सुनील देसरडा, लायन्स आंतरराष्ट्रीय डायरेक्टर डॉ.नवल मालू, माजी आंतरराष्ट्रीय डायरेक्टर राजू मनवानी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती मिळालेल्या लायन्सच्या  डब्यासाठी  धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर बेस्ट हँगर ऍक्टिव्हिटी अवार्ड देण्यात आला. दिलीप ठाकूर यांना मिळालेला हा ६८ वा पुरस्कार आहे.

 सर्वात मानाचा समजला जाणारा बेस्ट इन्फॉर्मड व  मोस्ट अक्टिव लॉयन अवार्ड प्रांत सचिव डॉ. विजय भारतीया यांना मिळाला. फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट पुरस्काराने शिवा शिंदे यांना गौरविण्यात आले. हे पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश जैस्वाल ,गौरव भारतीया, संजय अग्रवाल, अरुणकुमार काबरा ,सुरेश निल्लावार, ॲड. उमेश मेगदे, लालचंद आसवानी, स्नेहलता जायस्वाल घनश्याम शर्मा, सुरेश शर्मा, संतोष देशपांडे, सुनील साबू, डॉ. हिंगमिरे, बिरबल यादव,डॉ. प्रदीप राजपूत यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.  एकाच वेळी तीन पुरस्कार मिळाल्यामुळे नांदेड सेंट्रलचे तसेच विक्रमी अडुष्ठट पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post