हदगाव, शे.चांदपाशा| गेल्या आठवड्यात हदगाव तहसिल कार्यालयाच्या महीला नायब तहसिलदार यांनी अवैध रेती उपसा करणा-यावर केलेली कारवाई संशयाच्या भो-यात दिसुन येत आहे. या प्रकरणामुळे माञ तहसिल कार्यालयाच गौणखनिज विभाग पुन्हा चर्चेत आलेला आहे.
या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, दि.६जुलै २०२१ च्या दरम्यान महीला नायब तहसिलदार यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन येतो की, हदगाव तालुक्यातील मौजे आडा या गावच्या शिवारात कयादु नदीतुन अवैधरित्या रेतीचा उपसा होत आहे. ही गुप्त खबर मिळताच महीला नायब तहसिलदार ह्या खाजगी वाहनाने तहसिल कार्यालयाच्या चपरश्याला घेवुन त्या घटनास्थाळी गेल्या असता तिथे त्याना रेती भरलेला ट्रक्टर दिसुन आला.
तिथे गावचे पोलिस पाटील संरपच यांना जायमोक्यावर बोलवाले नंतर ते वाळुने भरलेले ट्रक्टर हे तहसिल कार्यालयाला लावयला सागितले असता त्या ट्रक्टर चालकाने त्याचे न ऐकता त्याने तो वाळूने भरलेला ट्रक्टर पळवुन नेले. त्या ट्रकटर चालकाने चिडुन जावुन महीला नायब तहसिलदाराच्या खाजगी वाहनामधील त्यांची ठेवलेली पर्स घेवुन त्यातील पाचहजार रु चोरुन नेले. अश्या स्वरुपाचा महीला नायब तहसिलदार यांनी वरिष्ठ अधिका-याना दिलेल्या अहवालात म्हटल्याचे समजते. त्यानंतर तो पर्स चोरी करणारा सापडल्यावर महीला नायब तहसिलदार यांनी त्या पर्स चोरणा-याकडुन माफीनामा लिहुन घेतला. या प्रक्रणाची वृतमानपञात उलटसुलट चर्चा झाल्यानंतर माञ आरोपी राम शिदे रा. मौजे (आडा) याच्यावर गु.र.न.१७६/२०२१ ३७९.३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
कारवाई संशयाच्या भोव-यात ...
जेव्हा महीला नायब तहसिलदाराला नदीतुन अवैध रेतीचा उपसा होतो. तेव्हा या बाबतीत तहसिलदार किवा उपविभागीय आधिकारी यांना माहीती न देता थेट नदीवर जाणे. तसेच जायमोक्यावर त्या गावाच्या सज्जाचे तलाठी किवा मंडळ निरक्षक यांची कारवाई करतेवेळी ते कुठे होते. जेव्हा महीला नायब तहसिलदाराची पर्स चोरी होते व नंतर पर्स चोरणारा व्यक्ती मिळतो. त्या व्यक्तीकडुन माफीनामा व नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. अणखीण विशेष म्हणजे एक महीला आधिकारी पोलिस संरक्षण न घेता खाजगी वाहनाद्वरे रेती घाटावर जाणे. एक तर महीला अधिकारी रेती माफीया विरोधात कारवाई करत असताना त्यांना योग्य कार्यालयकडुन सहकार्य मिळत नसावे. किवा स्थानिक पोलिस प्रशासनावर त्याचे विश्वास नसल्याचे या महसुल अधिका-याच्या कार्यशैलीवरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे रेती कारवाई प्रक्रणाचे माञ 'गुढ 'वाढतच आसल्याचे दिसुन येत आहे. हे आवर्जून ऊल्लेख करावा लागेल.
