बिलोली/नांदेड| आज समाजामध्ये काही प्रमाणात माता - पित्यांची हेंडसाळ होताना दिसून येत आहे.तर काही मुले आपल्या आई वडीलांचा व्यवस्थित सांभाळ करत आहेत.अशातच कै.बसवंतराव मुंडकर यांच्या ३८ व्या पुण्यस्मरणार्थ मुंडकर परिवाराने कृतज्ञता पित्याची...! हा कार्यक्रम घेऊन समाजाला दिशा दाखविण्याच काम केलं आहे.असे प्रतिपादन नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांनी केले.
ते दि.२० जुलै रोजी बिलोली येथे आयोजित कृतज्ञता पित्याची या चळवळीचा समारोप व कलावंतांचा सत्कार या कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त शिक्षक शामराव इनामदार यांची तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार गंगाराम ठक्करवाड,माजी आमदार सुभाष साबणे,माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे,सेवा निवृत्त सहाय्यक निबंधक वैजनाथ मेघमाळे,विजय कुंचनवार,प्रसिद्ध कलावंत दिलीप खंडेराय आदींची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमात खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांच्यासह स्वामी रामानंदतिर्थ विद्यापिठाचे कुलगुरू उद्धव भोसले,नायगावचे आमदार राजेश पवार यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी तालुक्यातील कार्ला बु येथील प्रसिध्द कव्वाल सलिम अरमान यांच्यासह त्यांच्या संचाने आषाढी एकादशी व बकरी ईद च्या निमित्ताने मनमोहक असे भक्ती गिते,देश गिते व कव्वाली सादर केली.
या समयी दि.९ जुलै पासून सुरू करण्यात आलेल्या कृतज्ञता पित्याची..! या चळवळीत सहभाग घेतलेल्या दत्ता तुमवाड प्रथम, वैजनाथराव मेघमाळे द्वितीय,तृतीय अशोक दगडे यांना तर देविदास कोंडलाडे व सौ.आशा रेड्डी यांच्या उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.तर सामाजिक कामांना वृत्तपञातुन नेहमीच प्रसिद्धी देणारे पञकार शेख अफजल व सोशल मिडीयाचे सय्यद रियाज यांचा प्रमाण-पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील आदर्श शिक्षक बालाजी गेंदेवाड, शंकर हमंद, विश्वनाथ चंचलवाड,नागनाथ इळेगावे, बिलोलीचे नगरसेवक तथा पञकार प्रकाश पोवाडे, विठ्ठल चंदनकर, निळकंठ गंगावार, शिवाजी पांडागळे, अभिजीत धरमुरे, सुमनबाई कोपुरवाड, हनमंत पालनोर, अनिल खंडेराय, सतिष मुंडकर यांच्यासह अनेजन उपस्थित होते. या कार्यक्रमाने सुञसंचलन प्रा.गोपाळ चौधरी यांनी केले.तर साईनाथ मुंडकर यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
