हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील श्रावण नंदकुमार धुमाळे वय (10 वर्ष ) हा आपल्या बाल मित्रांसोबत खेळत असतांना अचानक विषारी सापांचे त्याला दंश केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकल्यासोबत अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मौजे वाळकेवाडी येथील नंदकुमार यशवंत धुमाळे यांना एक मुलागा व एक मुलगी असा छोटा परिवार होता. त्या परिवारातील एक सदस्य मुलगा श्रावण नंदकुमार धुमाळेवय (10 वर्ष) हा आपल्या बाल मित्रांसोबत लपणा छपनी खेळत असतांना अचानक विषारी सापांचे त्याला दंश केला. त्या मुलाला साप चावला हे कळालेच नाही. तो फक्त मला कोणीतरी माझ्या पायावर मारले असेच मनत रडत होता. साप छोटा असल्यामुळे त्यांस कोणतीही जखम ओळखण पडली नाही. त्यामुळे परिवारातील कोणत्याही व्यक्तीला हे लक्षात आले नाही कि नेमके काय झाले.
मुलाला चक्कर येने, उलटी होणे, घसा कोरडा पडून जास्त तहान लागणे असे लक्षणे दिसून येत होते. हे लक्षण दिसून येताच त्या मुलाला तात्काळ तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांना मुलागा सिरीयस दिसल्यामुळे त्यांनी नांदेड येथे हलवण्यास सांगितले. त्यांच्या वडिलांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ ऍम्ब्युलन्स करून शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे नेले. त्या ठिकाणी मुलागा स्वतःहून डॉक्टरांच्या कॅबिन पर्यंत चालत गेला व अचानक चक्कर व उलटी होऊन खाली पडला. पडताच क्षणी डॉक्टर आले व डॉक्टरांनी येऊन मुलाला तपासणी केले आणि तुमचा मुलगा सर्पदंशामुळे दगावला असे घोषित केले.
पावसाळ्यात नागरिकांनी आपली व आपल्या लहान मुलाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण
पावसाळ्यात बीळे व जमिनीखालील जागा बुजल्या गेल्याने साप मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर मानवी वस्तीतील सुरक्षित ठिकाणे, त्यात दगड-विटांचे ढिगारे, घरांच्या कपारीचा असरा घेतात. याच दिवसात पक्षी अंडी देतात. बेडूक, सरडे, पाली असे प्राणी देखील मुबलक प्रमाणात आढळतात. सापांचे हे खाद्य असल्याने ते देखील यावेळी बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावि आणि आपली व आपल्या मुलाची सुरक्षा करावी हाच संदेश या घटनवरून मिळतो आहे.