मुक्रमाबाद लेंडी धरग्रस्तांचा बेमुदत जनआक्रोश आंदोलन

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) तालुक्यातील मुक्रमाबाद येथील लेंडी धरणात बाधीत होत असलेल्या १३१०घरांच्या मावेजा मीळावा यासाठी दि१२रोजी तब्बल १० तास राज्य महामार्गावर रास्तारोको व जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या जनआक्रोश आंदोलनात विविधता राजकीय , सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनास समर्थन दिले. प्रारंभी समस्त धरणग्रस्तांनी मुक्रमाबाद येथील महादेव मंदिर येथुन जारोंच्या संख्येने जनआक्रोश रँली काढुन
शासनाच्या विरोधात घोषना देत मुख्य बाजारपेठेतुन मार्गक्रमण करून बसस्थानक वरील मुख्य चौकात रँली पोहचताच धरग्रस्तांनी रास्तारोका व जनआक्रोश आंदोलनास सुरूवात केली. यावेळी काही आक्रमक धरग्रस्तांनी मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. व समस्त धरग्रस्तांनी राज्यमहामार्गावर तब्बल १० तास आक्रमक पणे आंदोलन करुन बसस्थानक हादरुन सोडले यावेळी मुक्रमाबाद येथील पुर्ण बाजारपेठ , शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद ठेऊन शासनाचा व संबंधित विभागाचा निषेध दर्शविला.

गेल्या ३४ वर्षापासुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे  रखडलेल्या लेंडी धरण व मुक्रमाबाद येथील १३१० घरांचा मावेजा आजतागायत पर्यत मिळाला नसल्यामुळे संतप्त धरणग्रस्त संघर्षमय मागणी करुनही प्रकल्पग्रस्तांच्या पदरात कोरड्या आश्वासनाशिवाय दुसरे काहीच पडल्या नसल्यामुळे येथील धरग्रस्तांना नरकयातना भोगावे लागत असल्याने . येथील प्रकल्पग्रस्तांनी दि१२रोजी बेमुदत बाजारपेठ व रास्तारोका आंदोलन संपुर्ण बाजारपेठ बंद ठेऊन शासनाचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात लेंडी धरणग्रस्त कृती समितीचे सुभाषप्पा बोधने, शिवराजप्पा आवडके, सुरेशदादा पंदीलवार, गंगाधर चामलवाड, गौस पठाण, ,राजेश्वरराव देशमुख, डाँ. एस. आर. नाईक, तुळशीराम वट्टमवार , हेमंत खंकरे , मन्मथ खंकरे ,बालाजी बोधने, बालाजी पसरगे, विनोद आपटे, असबअली कोतवाल यांच्यासह गावपरीसरातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते व या जनआक्रोश आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे स.पो.नि. इंद्राळे यांनी चोखा पोलीस बंदोबस्त ठेवला

येत्या नव्वद दिवसात मावेजा मिळवुन देऊ - आ. राठोड
येणाऱ्या अर्थसंकल्पात मुक्रमाबाद येथील बाथीत १३१० घरांना लागणार्या मावेजासाठी जास्तीत जास्त  निधी उपलब्ध करून येत्या नव्वद दिवसात मुक्रमाबाद वासियांना मावेजा मिळवुन देऊ. नव्वद दिवसात मावेजा मिळाला नाही तर मी स्वताहा धरग्रस्तांसोबत आमरण उपोषणास बसणार असल्याचे आ. तुषार राठोड यांनी सांगितले. राज्याचे जलसंपदामंञी गिरीष महाजन यांच्या भ्रमणध्वनी वरच्या आदेशावरून आ. राठोड यांनी धरणग्रस्त बांधवाना लेखी पञ लिहुन दिल्याने बेमुदत जनआक्रोश, रास्तारोका आंदोलन मागे घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी