तालुक्यातील भ्रष्ट ग्रामसेवकांच्या कारभाराला जनता वैतागली

हिमायतनगर (प्रतिनिधी)गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात कार्यरत असलेल्या काही पुढाऱ्यांच्या दलाल ग्रामसेवक महाशयांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. शासनाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या जनतेची अक्षरशः लूट करत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असताना याकडे गटविकास अधिकार्यांसह संबंधित वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विकासप्रेमी नागरिक व लाभार्थ्यातून केला जात आहे. 

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून,
तालुक्यात 53 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीत कार्यान्वित असलेल्या, अर्ध्याहून अधिक ग्रामसेवक हे जिल्ह्यासह अन्य सोयीच्या ठिकाणी राहून अपडाउनच कारभार चालवीत आहेत. अनेकजण तर आठ - आठ दिवस नेमून दिलेल्या गावाला भेटी देत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवडीच्या सर्वेचे काम चालू आहेत. तसेच दलित वस्ती, 12 वा वित्त आयोग, 14 वा वित्त आयोग्य अंतर्गत निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, स्मशान भूमी शेड निर्मिती, यासह विविध कामे केली जात आहेत, परंतु अनेक कामे अंदाजपत्रकाला बगल देऊन अत्यंत निकृष्ट पद्धतीची केली आहेत. त्यामुळे करण्यात आलेल्या कामाची गुणवत्ता ढासळल्याने आजघडीला अनेक कामे उखडू लागली आहेत. तसेच काही ग्रामसेवकांनी तर गावातील घरपट्टी वसुली करून शासनाच्या तिजोरीत जमा ना करता स्वतःच्या हातावर ठेऊन वापर करीत आहेत. हा प्रकार काही ग्रामसेवकांनी राजकीय वरदहस्त व नेतेगिरी करणाऱ्या अधिकारी, व संघटनेच्या वरिष्ठांच्या संगनमताने चालवित असल्याचे नियमांवर बोट ठेवणारे काही ग्रामसेवकांनी खाजगीत बोलताना प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले आहे. 

जी.प.बांधकाम विभाग अंतर्गत हिमायतनगर पंचायत समितीच्या देखरेखीखाली येणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध निधीचा गैर वापर करून काही कामे कागदावर तर काही कामे थातुर मातुर पद्धतीने करून बैंक बॅलन्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शासनाच्या योजना फोल ठरू लागल्या असून, असे अनेक प्रकार तालुक्यातील कार्ला पी, सवना ज. डोल्हारी, पळसपूर, एकंबा, सरसम, करंजी, दरेसरसम, पवना, सोनारी, दुधड - वाळकेवाडी, कामारी, कामारवाडी, जवळगाव घारापुर, मंगरूळ, धानोरा, पार्डी, एकघरी, चिचोर्डी, दगडवाडी, महादापूर, वडगाव ज., पोटा बु, बळीराम तांडा, दाबदरी, भोंडणी तांडा, वायवाडी, टाकराळा, पारवा खु, बु, वडगाव, यासह अनेक गावात मोजक्या ग्रामसेवकाच्या टोळीकडून चालविला जात असल्याच्या प्रतिक्रिया सुजाण नागरिक व विकास प्रेमी जनतेतून उमटत आहेत. 

वरील गावात कार्यरत ग्रामसेवकांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे विशेष पथक नेमून चौकशी केल्यास हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाची कुंडली उघड होण्याची दात शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच शासन व जनतेची दिशाभूल करून निधीचा गैरवापर, निक्रष्ठ कामे करून, जनता लाभार्थ्यांना त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित ठेऊन स्वतः मालामाल होऊ पाहणार्यां ग्रामसेवक, सरपंच व संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करावी. अश्या मागणीचे अनेक निवेदने हिमायतनगर येथील गटविकास अधिकाऱ्यासह संबंधितांकडे देण्यात आलेले आहेत. परंतु त्यांनीही सदर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पंचायत समितीत कार्यरत काही दलालाच्या सांगण्यावरून तक्रारकर्त्याच्या मागणीला कचऱ्याचा डब्बा दाखवित असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामसेवकाच्या अलबेल कारभाराकडे जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम सभापती, कार्यकारी अभियंता यांच्यासह जिल्हा प्रशासनने लक्ष देवून दलित वस्ती, 12 - 14 व वित्त अयोग्य रस्ते, नाली अन्य कामे, घरकुल योजना, शौचालय, शोष खड्डे निर्मिती घोटाळा, यासह अन्य विकास निधीतील कामाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. चौकशी झाली नसल्यास भ्रष्टाचार्यांच्या विरोधात लोकशाही मार्ग अवलंबून वेळप्रसंगी न्यायालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखवीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी