गौण खनिज माफिया सक्रिय..

महसूलच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या धामधुमीत गौण खनिज माफिया सक्रिय..

हिमायतनगर(वार्ताहर)सबंध महसुल प्रशासन निवडणुकीच्या धाम धुमित व्यस्त असताना याचा फायदा राजकीय वरद हस्त प्राप्त खनिज माफिया घेत असून, या चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल मात्र बुडत आहे. हा सव प्रकार महसूल विभागातील संबंधित अधिकायांच्या अशीवादाने होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे.

हिमायतनगर शहर व परिसरात सुरु असलेल्या कोट्यावधी रुपयाच्या विकास कामासाठी मुरूम, दगड व रेतीचा वापर केला जात आहे. या गौण खनिजाचे खोदकाम व वाहतुकीसाठी महसूल विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरु असून, आचार संहितेच्या निमानुसार नव्याने कामची सुरुवात व गौण खनिज उत्खननासाठी परवानगी देण्यात येऊ नये असे आदेश निवडणूक आयोगाने संबंधित विभागाला घालून दिले आहेत. परंतु सर्व नियम पायदळी तुडवून हिमायतनगर रेल्वे गेट ते खडकी बा.रेल्वे पटरी जाणार्या रस्त्यालागत असलेल्या नाल्यात विनापरवाना गौण खनिजाचे ब्लास्टिंग द्वारे मोठ्या परमाणात उत्खनन केले जात आहे. यामुळे भर उन्हाळ्यात पायावार्नाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु या सर्व नियमांना बगल देत राजकीय वरद हस्त प्राप्त गुत्तेदार खनिज माफियांकडून रात्री -अपरात्री व खुलेआम हजारो ब्रास उत्खनन करून ट्रेक्टर सारख्या वाहनातून वाहतूक केली जात आहे. सदरचे गौण खनिज हे खडकी बा.ते टेम्भोर्णी रस्त्यावरील कोट्यावधी रुपयातून केले जात असलेल्या पुलाचे काम व हिमायतनगर शहरात सुरु असलेल्या रस्ते विकास कामासाठी वापराला जात असल्याचे समजते. हा सर्व प्रकार महसूल विभागाचे जबाबदार अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी मिलीभगत करून सुरु असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे. महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगून कार्यवाही करण्यास तत्परता दाखवीत नसल्याने आओ चोरो.. बंधो भारा.....या उक्तीचा प्रत्यय येत असल्याचे दिसून येत आहे.

खरे पाहता महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उत्खननाला नाल्यात अथवा रेल्वे पटरी जवळ परवानगी दिली जात नाही. उत्खनन होत असलेल्या ठिकाणच्या नजीकच्या रेल्वे पूल १९८३ च्या अतिवृष्टीने तुटला होता. त्यामुळे अनेक महिने हा रेल्वे मार्ग बंद होता. परंतु आता तर चक्क याचा पुलाच्या नजीकचा ब्लास्टिंग च्या साह्याने जमिनीतून दगडाचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे येथील पुलास तडे जाऊन १९८३ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत सरसम वर्तुळाचे मंडळ अधिकारी श्री सय्यद यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, उद्या पाहुत मी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे असे मोघम उत्तर देवून वेळ मारून नेली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी