उमेदवार निश्चित अंतिम टप्यात

प्रमुख राजकीय पक्षात उमेदवार निश्चित अंतिम टप्यात 


लोहा(वार्ताहर)नगर पालिका निवडणुकीत 'प्रमुख पक्षांनी' प्रबळ उमेदवार देण्यासाठी गुप्त बैठकावर जोर दिला असून काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे तर दोन प्रभागात 'नवनिर्माण' करण्यासाठी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेस समोर आव्हान राहणार आहे.

नगर पालिकेच्या सतरा जागेसाठी २७ ओक्टोंबर रोजी मतदान होणार असून सोळा हजार आठशे मतदार आहेत. माजी आमदार प्रतापराव पाटील व आ. शंकर अण्णा धोंडगे यांच्यात नेतृत्व वाद 'पक्षश्रेष्ठी' कडे मिटला असून प्रतापरावाकडे नेतृत्व देण्यात आले असे सांगण्यात येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी काही भागात तर काही भागात रा.कॉ व मनसे यांच्यात 'लढत' होणार अशी चर्चा आहे. प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी 'गुप्तता' पाळली आहे.

काँग्रेस कार्यालयात प्रदेश सरचिटणीस आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, जिल्हाउपाध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग सरचिटणीस संजय भोसीकर आदी प्रभूतीच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती  सोमवारी पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आ.प्रतापराव पाटील यांनी उमेदवारांच्या निश्चितासाठी जनमताचा कौल घेतला असून प्रभागातून सर्वे करण्यात आला. सर्व ताकदीनिशी माजी मुख्यमंत्र्या सोबत  लढत द्यावी लागणार हे जाणून प्रतापराव तयारीला लागले आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रथमच माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरत आहे. काँग्रेस-राकॉ ला 'शह' देण्यासाठी सर्व तयारी 'मनसे' नी केली आहे. स्वतः वार्डातून माजी आ. चव्हाण भेटी गाठी घेत आहेत. शिवसेनेचे प्रा. मनोहर धोंडे यांनीही उमेदवार निश्चित केली आहे. प्रभाग निहाय इच्छुकांच्या व प्रभावी उमेदवारांच्या मुलाखती घेणे अंतिम टप्प्यात आले आहे. असे सांगण्यात आले. एकंदरीत नामनिर्देशन दाखल करायच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे ३ व ४ ओक्टोंबर रोजी शक्ती प्रदर्शन करून 'उमेदवारी' दाखल होईल असा अंदाज आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी