नविन नांदेड। सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या व्दितीय पुण्यस्मरण निमित्ताने हडको गोविंद गार्डन मंगल कार्यालय येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शि.भ.प.रजनीताई मंगले यांच्ये शिव किर्तन व सुप्रसिद्ध गायीका गोदावरी ताई मुंडे यांच्यी गायन साथ मंगल आरती नंतर महाप्रसाद आयोजन केले आहे.
प.पु. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज १ सप्टेंबर २०२० रोजी लिंगैक्य झाले. माऊलींनी १०४ वर्षे आपले आयुष्य समाजासाठी अहोरात्र झिजविले. सामाजिक अध्यात्मिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यात अलौकीक योगदान दिले. प.पु. गुरुमाऊली देहरुपाने जरी आज आपल्या मध्ये नसले तरी त्यांनी दिलेले ज्ञान, शिकवण आचरणात आणणे हे आपले कर्तव्य आहे. त्याकरीता या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
-दिव्य - सानिध्य प.पु.गुरुवर्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज व आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ (राजुर) अहमदपुर यांचे अमृतोपदेश १ सप्टेंबर २२ रोज गुरुवारी सकाळी ठिक ११ शि.भ.प.रजनीताई मंगलगे गंगाखेड (सुप्रसिध्द किर्तनकार व गुरुदेव या चरित्रपर पुस्तकाच्या लेखिका) यांचे शिवकीर्तन व सुप्रसिद्ध गायीका गोदावरीताई मुंडे गंगाखेड यांची गायनसाथ व मंगलारतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वीरवैरागिनी अक्का महादेवी महिला भजनी मंडळ हडको, गुरुदेव मित्र मंडळ, नांदेड व सद्भक्त मंडळी सिडको-हडको, जिंदमनगर नविन नांदेड यांनी केले आहे.