67 वा विभागीय रेल्वे सप्ताह साजरा, 346 कर्मचाऱ्यांचा गौरव -NNL


नांदेड|
169 वर्षा पूर्वी, दिनांक 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिल्यांदाच बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणात भारतीय रेल्वे दर वर्षी  एप्रिल महिन्यात  रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ठ कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरवण्यात येते.

नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात 67  वा रेल्वे साप्ताह पुरस्कार सोहळा (डी.आर.एम. अवार्ड) आज दिनांक 21  एप्रिल, 2022  रोजी साजरा करण्यात आला. श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते  346 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात नांदेड रेल्वे विभागातील 260 व्यक्तिगत तर 18 सांघिक पुरस्कार   देवून कर्मचाऱ्यांचा गौरव  करण्यात आला.  या प्रसंगी श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड  यांच्यासह इतर विभागीय रेल्वे अधिकारी  आणि कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आपल्या उद्घाटन पूर्ण भाषणात वर्ष  2021-22   दरम्यान कोविड महामारीच्या समयी सुद्धा नांदेड रेल्वे विभागाने  केलेल्या उत्कृष्ठ कार्याची माहिती दिली. या कामगिरी बद्दल सर्व रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. श्री सिंघ यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आवाहन केले कि त्यांनी उपलब्ध साधनांचा आणि निधीचा योग्य आणि सुनियोजित वापर करावा  तसेच उत्पन्न वाढीबरोबरच अनावश्यक खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा. नांदेड रेल्वे विभागाने केलेल्या अभिमानस्पद कामगिरी मुळेच नांदेड रेल्वे विभागाला पहिल्यांदाच मानाची समजली जाणारी महाव्यवस्थापकांची  ‘सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता ढाल’ (GM’s Efficiency Shield for Overall best Performance) देवून गौरविण्यात आले.


या ढाली सोबतच नांदेड रेल्वे विभागाला सर्वोत्कृष्ठ लोडिंग एफर्ट (माललदान) शिल्ड मिळाली आहे. नांदेड वाणिज्य विभानाने या वर्षी विशेष कामगिरी करत मालवाहतुकीत गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट मालवाहतूक केली आहे,  फक्त मालवाहतूकच नाही  तर प्रवासी भाडे, तिकीट चेकिंग मध्ये सुधा रेकोर्ड उत्पन्न मिळविले आहे. नांदेड विभागाने ट्रेक नवीनीकरण मध्ये सुधा उल्लेखनीय कार्य केले आहे. यात 22 किलोमीटर सी.टी.आर., 138 किलोमीटर थ्रू फिटिंग रेनुवल, 70 किलोमीटर डीप स्क्रीनिंग केले आहे. तसेच पेडगाव स्टेशन वर नवीन फलाटफोर्म , मनमाड येथील रंनिंग रूम मध्ये सुधार, नांदेड रेल्वे दवाखान्यात ओक्सिजेन प्लांट तसेच एक्स रे मशीन बसविण्यात आली आहे. नांदेड रेल्वे विभागाला यावर्षी बेस्ट एलिमिनेशन ऑफ लेवेल क्रोस्सिंग ची ढाल सुधा  मिळाली आहे. 

नांदेड रेल्वे विभागात रेल्वे विद्युतीकरणाचे कार्य जोमाने सुरु आहे. हिंगोली –वाशीम, रोटेगाव-औरंगाबाद दरम्यान कार्य वेगात आहे. बाकीच्या ठिकाणीही हे कार्य लवकर सुरु होईल. यावर्षी भांडार विभागाने 2862 मेट्रिक टन भंगार जमवले आहे, या पैकी 2208 मेट्रिक टन भंगार चा लिलाव करण्यात आला आहे. यातून रेल्वे विभागाला 8.24  करोड रुपये प्राप्त झाले आहेत. सुरक्षा विभागाच्या उत्कृष्ठ कार्यामुळे नांदेड रेल्वे विभागात वर्ष 2021-22 दरम्यान एकही अपघात झालेला नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या वर्षी विविध रेल्वे स्थानकावर 81 सर्विलेंस केमेरे लावले गेले आहेत.   

या वर्षी नांदेड रेल्वे विभाग राजभाषा च्या वापरत पुढे राहिला आहे. नांदेड विभागाला सर्वोत्कृष्ठ राजभाषा ढाल मिळाली आहे. तसेच अप्पर रेल्वे व्यवस्थापक साहेबांना राजभाषा मध्ये उत्कृष्ठ कार्य केल्यामुळे  रेल्वे बोर्ड लेवेल  वर कास्य पदक प्राप्त झाले. तसेच नांदेड रेल्वे विभागाने एक्स्प्रेस रेल्वे च्या समय पालनात 95 % सफलता मिळाली आहे. श्री सिंघ  म्हणाले कि सुरक्षा हि  रेल्वे ची नेहेमीच प्राथमिकता राहिली आहे. तसेच प्रवासी सुविधे मध्ये वाढ करण्याकरिता नांदेड रेल्वे नेहेमीच प्रयत्नशील आहे. कोविडच्या कठीण समयी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे कार्य केले आहे यात रेल्वे कर्मचारी संघटनांचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. याबद्दल श्री सिंघ यांनी सर्व रेल्वे कर्मचारी संघटनांचे आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी