हिमायतनगरातील किनवट - नांदेड मार्गावरील घर फोडून चोरट्यांनी साहित्य लांबवीले -NNL

चोरट्याचे पोलीसासमोर अवाहन; श्वान पथकास केले पाचारण 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेल्या चोरट्यानी मध्यरात्रीच्या शहरात चोरट्यांनी शिरकाव केला आहे. दि.३१ च्या मध्यरात्रीला किनवट - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेले खैरगावचे माजी सरपंचाचे घर फोडून एल.ईडी टि. व्ही सह इतर महागडे साहित्य लंपास केले आहे. या घटनेमुळे पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

मागील महिन्यात शहरातील सदाशिव मार्केट मधील भुसारचे दुकानाचे शटर वाकवून ३३ कुंटल सोयाबीन चोरीला गेले होते. या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आल्यानंतर चॊरीच्या घटना थांबल्या होत्या. परंतू सुरु असलेल्या थंडीच्या लाटेचा फायदा घेत पुन्हा शहर व ग्रामीण भागात चोरटे सक्रिय झाले आहेत. दि. ३० जानेवारीच्या रात्री सवना ज., जिरोना, महादापूर येथे ७ ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून सोन्या, चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरून नेली होती. एवढेच नाहीतर जागी झालेल्या नागरिकांवर चोरट्यानी दगडफेक केली. या घटनेचा तपास पोलिस करत असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीच्या म्हणजे दि.३१ च्या रात्री चोरट्यानी हिमायतनगरात शिरकाव केला.

या संदर्भात राजेश जाधव म्हणाले कि, यापूर्वी माझ्या घरी ३ वेळा चोरी झाली, एकवेळ तर गावाकडे सुद्धा झाली. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणत्याच चोरीचा तपस लावला नाही. मी कधी हिमायतनगर तर कधी खैरगाव येथे राहतो हे सर्वाना माहित आहे, कदाचित मी येथे नसल्याचे पाहून हि चोरी झाली असल्याचे मला वाटते. पोलिसांनी जर याचा कसून तपास केला तर चोरटे आपोपाप गळाला लागतील असे त्यांनी सांगितले. 

किनवट - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेले खैरगावचे माजी सरपंच राजेश जाधव यांचे राहते घर फोडून चोरटयानी एल.इडी. टि. व्ही. व इतर महागडे साहीत्य चोरून नेले आहे. आणि घरातील सामानाची नासधूस करून कपात फोडून नुकसान केले आहे. मूळ गाव खैरगाव येथे गेलेले राजेश जाधव सकाळी घरी आले असता हि घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती हिमायतनगर पोलिसांत दिल्यावरून तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित होऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांशी पाचारण केले. दाखल झालेल्या श्वान पथकास काही सुगावा लागू शकला नाही.  याबाबत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हिमायतनगर पोलीस डायरीत अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सोयाबीन चोराच्या जश्या मुसक्या आवळल्या, तश्याच प्रमाणे या चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.  

सदर घटनेचा तपस नूतन पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्ग दर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोहेकॉ. अशोक सिंगणवाड हे करीत आहेत. या चोरीच्या घटनेला पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून, लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळून ताबडतोब बंदोबस्त करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी