शहीद सुधाकर शिंदे हे नवयुवकांचे स्पुर्ती स्थान : उपविभागीय पोलीस अधिकारी सागळे -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


नांदेड|
शहीद सुधाकर शिंदे यांचा शालेय शिक्षणापासून ते उपविभागीय पोलिस अधिकारी पदापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. पण  प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर त्यांनी सर्व परिस्थितीवर मात करीत ते देशाच्या सेवेसाठी सैन्यात दाखल झाले. 

पण छत्तीसगढ येथील नक्षलग्रस्त भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांनी गस्त घालणार्‍या दलावर अंधाधुंत गोळीबार केला. यामध्ये सहाय्यक कमाडंट शहीर सुधाकर शिंदे यांनी आपल्या प्राणाची आहुती देत सर्वेच्च बलिदान दिले. त्याच्यात असलेली देश भावना व गावा विषयी असलेले प्रेम पहाता शहिद सुधाकर राजेद्र शिंदे हे नवयुवकांसाठी कायम स्पुर्ती स्थान असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी सचीन सांगळे यांनी सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना वेळी रविवार दि.14 रोजी बामणी येथे केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शहीद सुधाकर शिंदे यांच्या प्रति व्यक्त करण्यासाठी मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहीद सुधाकर शिंदे यांच्या स्मृतीस्थळी शासनाकडून कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शहीद सुधाकर शिंदे यांच्या वीर पत्नी सुधा सुधाकर शिंदे व परिवारास राष्ट्रध्वज आणि 45-बटालियन आयटीबीपीचे स्मृतीचिन्ह अर्पण करण्यात आले. यावेळी तहसिलदार काशिनाथ पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचीन सांगळे, 45-बटालियन पोलीस निरीक्षक रजणीश कुमार, 44-बटालियन सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक टेलीकमा सुखविद्रा, 45-बटालियन हवलदार दिंगाबर ढंगे, व इतर चार जवान मदुराई तामिलनाडू यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक  गजानन कागणे, सरपंच माधवराव पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनिल पारडे, शेख दस्तगीर, पोलिस पाटील व्यंकटराव पाटील, मराठी पञकार संघाचे अध्यक्ष गंगाधर चामलवाड, यशवंतराव कुलकर्णी, बालाजी बोधने, बालाजी पसरगे, शेख मन्नुसाब याची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना सांगळे, म्हणाले की, आजच्या नवयुवकांनी शहिद सुधाकर शिंदे यांची प्रेरणा घेऊन देश सेवेसाठी सैन्यात दाखल व्हावे. देश सेवा हीच खरी सेवा आहे. यावेळी परीसरातील असंख्य नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शहीद सुधाकर शिंदे, अमर रहे... जब तक सुरज चांद रहेगा सुधाकर शिंदे तुम्हारा नामा रहेगा.... या घोषणाने परिसर दणाणून गेले होते.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post