किनवट, माधव सुर्यवंशी| राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कर्मचा-यांनी दिनांक ०८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबई येथिल निवास्थान सिल्वर ओक येथे केलेल्या हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष किनवट तर्फे नोंदवण्यात आला असुन, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले असुन निवेदनात सदर हल्ल्यात सहभागी कर्मचारी व एकुण रचण्यात आलेल्या षडयंत्रा मागील सुत्रधाराला शोधुन त्याला दंडीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी निषेध नोंदवला असुन निवेदनाव्दारे सदर घटनेची सखोल चौकशी करुन दोषीं विरुध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे साजिद खान, जहिरोद्दीन खान, राहुल नाईक, अजित साबळे, कचरु जोशी, बालाजी बामणे, संदिप जोमदे, नागनाथ भालेराव, अश्विन पवार, कैलास जाधव, गोविंद धुर्वे, अमरदिप कदम, अमोल जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.