राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नगरसेवक शेख जाकीर यांची निवड -NNL


अर्धापूर|
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नगरसेवक शेख जाकीर यांची निवड झाल्याचे जाहीर होताच नांदेड सह अनेक तालुक्यात जल्लोषात निवडीचे स्वागत करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खा.सुप्रियाताई सुळे,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड.मोहम्मद खान पठाण यांनी राष्ट्रवादीचे पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसिकर,राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नगरसेवक शेख जाकीर यांची निवड केली असून प्रदेश उपाध्यक्ष शेख जाकीर यांना निवडिचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अँड.मोहम्मद खान पठाण यांच्या हस्ते देण्यात आले. 

राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष पदी नगरसेवक शेख जाकीर यांची निवड जाहीर होताच अर्धापूर तालुकासह अनेक ठिकाणी फटाके फोडून,सत्कार करीत जल्लोषात स्वागत केले यावेळी युवकचे तालुकाध्यक्ष पप्पू पाटील टेकाळे, शहराध्यक्ष शेख साबेर,उद्धवराव राजेगोरे, जिल्हा चिटणीस अँड.सचिन देशमुख, जिल्हा संघटक आत्माराम कपाटे, युवकचे शहराध्यक्ष संदिप राऊत,अजिंक्य देशमुख यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी