हिमायतनगरच्या नाल्यात आढळला पुरुष जातीचा चिमुकला (अभ्रक)

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहराजवळील विसावाबार नजीक असलेल्या नाल्यात एक 2 महिन्याचे पुरुष जातीचा चिमुकला (अभ्रक) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वैरिणी मातेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केल्या जात आहे. तर याबाबत उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर वे तेलंगणा - विदर्भ राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. दिवसेंदिवस तालुक्याची लोकसंख्या व येथे येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने काही धनदांडग्या डॉक्टरांनी मोठं - मोठी दवाखाने थाटून आरोग्य सेवेच्या नावाखाली गोरखधंदा चालविला जात असल्याचा आरोप अव्वाच्या - सव्वा बिलामुळे त्रस्त झालेल्या नागरीकातून केला जात आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वेळेवर रुग्णांना उपचार मिळाले दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गरजूना खाजगी दवाखान्यात उपचार व प्रसूतीसाठी जावे लागत आहे. याचा संधीचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन गरज नसताना आणि अनधिकृतरित्या डी - कंपनीचे औषधे रुग्णांवर लादून मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. अश्या अनेक घटना समोर येत असल्या तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी..? एखाद्याने तक्रारी दिली तरी राजकीय वरदहस्तामुळे यावर तात्काळ पडदा टाकला जात आहे. अश्यामुळेच कोण्यातरी एका खाजगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या वैरिणी मातेने चक्क आपल्या पोटाच्या गोळ्याला अंदाजित 2 ते 2.5 महिन्याच्या मुलाला ( अभ्रकाला ) शहरानजीकच्या नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी समोर आला आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास येथील विसावा बारच्या बाजूला असलेल्या नाल्यात एका अभ्रकाचे काही कुत्रे लचके तोंडात असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिसून आले. हा काय..? प्रकार आहे पाहण्यासाठी आलेल्यांनी कुत्र्यांना हाकलले. या ठिकाणी एक पुरुष जातीचे अभ्रक अंदाजित 2 महिन्याचे मृत अवस्थेत दिसून आले. त्या मुलाच्या हातात मनगटे व पायात वाळे सुद्धा होते. सदरच्या मुलाची नाळ पडलेली असल्याने हा मुलगा (अभ्रक) अनैतिक सबंधातील असल्याने अडसर ठरू नये म्हणून, कोण्यातरी वैरिणी मातेने अथवा समर्थकाने कमरेला करदोडा बांधून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने येथे फेकून दिले असावे. असा तर्क वितर्क उपस्थितांमधून लावला जात आहे. एकूणच घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. तर पोलीस आल्यानंतर जवळपास तासभर वाहतूक खोळंबल्याचे दिसून आले वृत्त लिहीपर्यंत पोलीस डायरीत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान सदरचे अभ्रक कोणी फेकले.. याचे नेमके कारण काय.... कोठे जन्म झाला....सदर मुलाची माता कोण... या बाबतची चौकशी करून शहरात घडलेल्या घटनेचा उलगडा करावा अशी मागणी उपस्थितांनी केली आहे. घटनेचा अधिक तपस पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डांगरे हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी