NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 25 नवंबर 2015

धान्याच्या काळ्या बाजार

स्वस्त धान्याच्या काळ्या बाजार करणाऱ्या भ्रष्ट दुकानदारांना पुरवठा विभागाचे अभय

हिमायतनगर(प्रतिनिधी)गोर गरिबांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा ऑनलाईन रेकोर्ड होत असले तरी तालुक्यात धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालूच आहे. तेलंगाना राज्याच्या सीमेवर असलेले हिमायतनगर शहरात परिसरातील अनेक तालुक्याचे धान्य एकत्र होऊन परप्रांतात पाठवून धान्याच्या काळ्या बाजार केला जात असल्याने एक प्रकारे केंद्रबिंदू बनले आहे. या भ्रष्ट रेशन दुकानदार व माफियांना तहसील पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्यानेच लाभार्थ्यांना जादा दर आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एवढेच नव्हे तर ऐन दिवाळीत बहुतांश लाभार्थ्यांना साखर मिळाली नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या गैर प्रकारची नूतन तहसीलदार श्री गजानन शिंदे साहेब दखल घेवून त्या दुकानदार व धान्य माफियावर कार्यवाही करतील काय..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हिमायतनगर तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायती असून, त्या सर्व गावातील कुटुंबाना जवळपास ७३ परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार आहेत. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्याना लाभ मिळत असला तरी अन्न सुरक्षा योजनेचे बहुतांशी लाभार्थी हे सधन कुटुंबातील घेण्याचा चमत्कार अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे. राशन कार्डची फोड करून संख्या वाढविण्यात स्वस्त धान्य दुकानदार यशस्वी झाले आहेत. विभक्त राशन कार्ड करून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा मालीदाही अनेक दुकानदारांनी लाभार्थ्याकडून ५०० ते १००० प्रती कार्ड या प्रमाणात लाटल्याचे अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या होत्या. परंतु भागीदारीत असलेल्या पुरवठा विभागाच्या संबंधिताने एकाही दुकानदाराची चौकशी करण्याचे वा कार्यवाही करण्याचे धारिष्ठ दाखविले नाही. परिणामी पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने नागरिकांचा संताप अनावर होत असून, अनेक स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना कमी धन्य देवून एक तर जादा दर आकारतात. आणि महिन्याला किमान आठ ते पाच कुंटल धान्य काळ्या बाजारात विक्री करून रजिस्टर मेंटन करत असल्याचे नागरिक सांगतात. 

हिमायतनगर शहर तेलंगाना सीमेवर असल्याने अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्याचा माल हे येथूनच तेलंगाना मध्ये पाठविल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात हिमायतनगर येथील अनेक स्वस्त धान्य दुकानदारासह राजकीय वरदहस्त असलेले बडे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येते. यात अनेक दुकानदार पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांना हाताशी धरून गोर - गरीबांचा घास काळ्या बाजारात विकून मालामाल होत आहेत. परिणामी हक्काच्या धान्यापासून वंचित राहून गरिबांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ येत आहे. 

परवानाधारक बहुतांश स्वस्त धान्य दुकानदार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्याचे वितरण करीत नसून, महिन्यातून पाच - आठ दिवस दुकान उघडून उर्वरित माल परस्पर काळ्या बाजारात लांबवीत असल्याचे वंचित लाभार्थ्यामधून सांगितल्या जात आहे. वितरीत केलेल्या धान्याची लाभार्थ्यांना पावती दिली जात नसून, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकच दर आकारून दिवसा - ढवळ्या लाभार्थ्यांची लुट करीत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आअहेत. अनेक दुकानदार उर्वरित स्वस्तधान्य प्रशासनाकडे परत देत असल्याचे सांगत असले तरी खरा प्रकार काही औरच असल्याचे आढळून येते आहे. 

केरोसीन वितरणमध्ये सुद्धा घोळ 
----------------------------- 
रेशन बरोबर यातील व अन्य मिळून ७८ दुकानदाराकडे केरोसीन वितरणाचा ठेका दिलेला असल्याने त्यातही मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार दिसून येते आहे. नियमानुसार कार्डधारकांना डावलून वाहनांना ३० ते ३५ रुपये जादा दराने रॉकेलची विक्री केली जात आहे. विजेच्या टंचाई मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना केरोसीन मिळत नसल्याने गोड्तेलाचे दिवे लावावे लागत आहेत. तर ऐपत नसलेल्या झोपडीतील कार्ड धारकांना रात्रीला अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, नव्याने रुजू झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देवून खर्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून भ्रष्ट दुकानदारावर व धन्य - केरोसिनचा काळ्या बाजाराला मूकसंमती देणाऱ्या पुरवठा विभागातील संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी धान्य व केरोसिनच्या लाभापासून वंचित लाभार्थी व नागरीकातून केली जात आहे. 

दिवाळीत अनेकांना साखर मिळालीच नाही 
----------------------------- 
यावर्षी महागाईने उच्चांक गाठल्याने शासनाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाना साखरेचे नियतन मंजूर केले होते. त्या प्रमाणे प्रती व्यक्ती लहान - मोठे असे ५५० ग्रेम साखर १३ रुपये ५० पैसे या दरानेच देणे अनिवार्य होते. त्याचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अन्नपूर्णा, अंत्योदय व अन्नसुरक्षा यांना लाभ मिळणार होता. परंतु काही रेशन दुकानदारांनी दिवाळीपूर्वी वितरण तर केलेचे नाही. अनेकांनी तर साखर गायब केल्यामुळे बहुतांश कुटुंबियांची दिवाळी कडू झाली. याबाबत काहींनी तहसील कार्यालाकडे साखर मिळाली नसल्याच्या तक्रारी केल्या. परंतु लाल्चावलेल्या संबंधित अधिकार्यांनी त्या दुकानदारावर कार्यवाही करणे तर सोडाच आपल्या स्वार्थासाठी अभय दिल्याचा आरोप वंचित नागरिक करीत आहेत. 

याबाबत पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शे.रफिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी बाहेरगावी लग्नात आहे. तुम्हाला काय माहिती पाहिजे ते सकाळी ऑफिसला या काढून देतो असे सांगितले.

सोमवार, 23 नवंबर 2015

कार्तिक स्वामी दर्शन समर्पण

बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी.. २५ रोजी दर्शनाचा योग 


शहरातील बालाजी मंदिरात असलेल्या भगवान श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिर संचालकाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी कार्तिक शु.१४ बुधवार दि.२५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्र दिनी तीन योग एकत्र आल्यामुळे सपत्निक कार्तिक स्वामी दर्शन घेत येईल अशी माहिती वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली. 

हिमायतनगर शहर हे देवी - देवतांच्या मुर्त्यांचे शहर म्हणून सबंध महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त आहे. हजारो वर्षापूर्वीच्या अखंड पाषाणातील दुर्मिळ मुर्त्या खोदकाम तथा बांधकामाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक मूर्ती म्हणजे (षडानंद) कार्तिक स्वामीची असून, कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सदर मूर्ती अत्यंत रेखीव व देखणी असून, नांदेड जिल्ह्यात हि एकमेव मूर्ती मोरावर आरूढ झालेली आहे. सदर मूर्ती दर्शनसाठी विदर्भ, तेलंगाना, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील दूर दूरवरून भाविक - भक्त दर्शनसाठी येतात. 

या जन्मी विद्या बुद्धी, धन ऐश्वर्य, पुत्र - पोत्र संपदा समर्पनेने सुख समृद्धी आगता...पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी श्री कार्तिक स्वामीची सर्वांनी दर्शन घ्यावे असे आव्हानही त्यांनी केले आहे. दि.२५ रोजी सकाळी ४ वाजता येथील बालाजी मंदिरात विराजमान असलेल्या भगवान कार्तिक स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक महापूजा संपन्न होऊन प्रसाद वितरण केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी ७.३७ पासून ते रात्री २८.१४ म्हणजे गुरुवारच्या पहाटे ४.१४ वाजेपर्यंत भक्तांना श्रीचे दर्शन घेण्याचा विशेष योग जुळून आला आहे. 

" कार्तिक स्वामी " दर्शन विधी 
------------------------ 
यावर्षी कार्तिक शु.१४ बुधवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३७ पासून २८/१४ पर्यंत पोर्णिमा व कृतिका नक्षत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. प्रथम स्नान करून कार्तिकेयाचे दर्शन घेवून दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप, दीप अर्पण करून कार्तिकेयाचे वाहन मयुराची पूजा करावी. त्यानंतर पुढे दिलेले श्लोक म्हणून एक एक उपचार अर्पण करावा. 

श्लोकाने जलाने भरलेला व त्यात किंचित सुवर्ण घातलेला कमंण्डलु समर्पण करावा. ब्राम्हण जन्मप्राप्तीकरता श्लोकाने यज्ञोपावित अर्पण करावे. श्लोकाने गोपीचंदन समर्पण करावे. श्लोकाने पोवते अर्पण करावे, सर्व पाप दूर होण्याकरिता या श्लोकाने तीळ अर्पण करावे. श्लोकाने दर्भ अगर कुश चरणावर अर्पण करावे, अठावीस रुद्राक्षाची माळ अर्पण करावी. 

दैन्य अज्ञान नाहीसे होण्याकरिता या श्लोकांनी सुवर्ण अर्पण करून नमस्कार करावा. श्री कार्तिक स्वामींचे दर्शनास जाणार्यांना हे वरील आठ श्लोक येणे आणि वरील वस्तूही जवळ ठेवणे आवश्यक आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा हा विधी आहे. भाद्रपद शुद्ध ६ ला कार्तिकेय दर्शन घेतले व स्मरण केले असता पापांचा नाश होतो. भविष्य पुराणात कार्तिकेची मूर्ती करून पूजा करावयास सांगितले आहे. निलतीर्थांचे स्मरण करून स्नान करावे. आणि वरील प्रमाणे उपचार अर्पण करावेत. ...............अनिल मादसवार

तुळसी विवाहतुळसी विवाहास आजपासून प्रारंभ.....

कार्तिक महिना प्रारंभ झाला की वेध लागतात ते म्हणजे तुळसीच्या लग्नाचे. मग पंधरा दिवस अगोदरपासून तुळसी वृंदावन सजविण्यासाठी लक्ष दिले जाते. तुळसीचा मामा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो ऊस लग्नाच्या पूर्वसंध्येला रुसलेला दिसून आला. 

तुळसीचा विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी केला जातो. विवाहात तुळस ही वधू आणि कृष्ण हा वर असतो. ऊस हा 'मामा' म्हणून आपली भूमिका बजावतो. दरवर्षी स्त्रीया आषाढी एकाशीला तुळसीचे रोप लावून तिचे संगोपन करतात. पंधरा दिवस अगोदरपासून तुळसीवृंदावन सजविले जाते. त्यावर राधा-दामोदर असे लिहून चारही बाजूला रांगोळी काढली जाते. यानंतर पाच किंवा सात उसांचा मांडव तयार केला जातो. ऊस, झेंडूची फुले, चींच, आवळा आदी तुळसीसमोर चौरंगावर ठेवली जातात. स्वस्तिक काढून त्यावर कृष्ण व राधाची मूर्ती ठेवली जाते. सायंकाळी सूर्य मावळल्यावर मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान आदी साहित्यांसह विवाह विधीनुसार मंगलाष्टकांसह पार पाडला जातो. नंतर चौरंग किंवा पाटावर मांडलेल्या राधा-दामोदरची आरती करुन आलेल्या मंडळींना प्रसाद दिला वाटण्यात येतो. विवाहाच्या पूर्वसंध्येला ५0 रुपयाला पाच ऊस विकल्याचे दिसून आले. २३ नोव्हेंबर रोजी तुळसी विवाहास प्रारंभ झाला असून २५ नोव्हेंबर रोजी विवाहाची समाप्ती होणार आहे. 


औषधी वनस्पती तुळशीला मानाचे स्थान 
--------------------- 
तुळसीला मानाचे स्थान आहे, कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळस अंगणात किंवा बालकणीत असल्यास हवा शुद्ध राहते. तुळस ही कफनाशक व पाचक असून सर्दी, पडसे, खोकला, दमा आदी विकारावर ती गुणकारी अशीच आहे. तुळसीची पाने, आले व गूळ याचा काढा करुन पिल्यास जळजळ किंवा पित्त होत नाही. कोलायटीस, अंग दुखणे, सर्दी, पडसे, डोकेदुखी यावर तुळस ही गुणकारी आहे.उचकी लागल्यास तुळसीची पाने खावीत, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तुळस उपयुक्त आहे, असे जुणे-जाणते सांगतात. वृंदावनी, विश्‍वपूजिता, पुष्पसारा, कृष्णजिवनी अशा अनेक नावांनी तुळसीला ओळखले जाते. तुळसीला एक विशिष्ट सुगंध असून ती तीन ते चार फूट इतकीच वाढू शकते. त्यामुळे अंगणात किंवा बालकणीत तुळस लावली जाते. कृष्ण तुळस आणि पांढरी तुळस असे दोन प्रकार असून यापैकी कृष्ण तुळस ही औषधी म्हणून परिचित आहे. तुळसीचे औषधी गुण आणि धार्मिकता यामुळे वारकरी संप्रदायात तिला मानाचे स्थान आहे. अशी माहिती पुरोहित कांता गुरु वाळके यांनी नांदेड न्युज लाईव्हशी बोलताना दिली. ......... अनिल मादसवार

शनिवार, 21 नवंबर 2015

तिनचाकी गाडा बनला सर्वांचे आकर्षण

भंगार दुचाकीपासून बनविलेला तिनचाकी गाडा बनला सर्वांचे आकर्षण

हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील एका युवकाने भंगारमधील दुचाकीचा उपयोग करून एक तीन चाकी गाडा बनविला असून, त्यावरून जवळपास ५ कुंटलचे वजन वाहतूक करण्यात येत आहे. हा मालवाहू गाडा फिरताना हिमायतनगर शहर वासियांचे आकर्षण बनला आहे. 

येथील माजी पंचायत समितीचे उपसभापती लक्ष्मीबाई भवरे यांचे चिरंजीव परमेश्वर भवरे या युवकाने हिमायतनगर येथील जी.प.शाळेत शिक्षण घेतले. मात्र इयत्ता दहावीत नापास झाल्याने तो पूर्णतः खचला होता, त्यामुळे जो - तो व्यक्ती तसेच घरचे सुद्धा तू कोणत्याही कामाचा नाहीस म्हणून हिणवत होते. त्यामुळे व्यतिथ झालेल्या परमेश्वरने कोणताही वाईट विचार न करता नागपूर शहर गाठले त्या ठिकाणी राहून एका मोटार सायकल मेकैनिकलच्या हाताखाली दोन वर्ष काम शिकले. त्यानंतर परत हिमायतनगर शहरात येवून आपला पारंपारिक केळीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. यात त्याला भरपूर यश मिळाले, परंतु यावर त्याचे समाधान झाले नाही. त्याने गेल्या महिन्याभरापासून मेकैनिकलच्या हुनर (शक्कल) वापरून शहरातील एक भंगार झालेली दुचाकी ५ हजारात खरेदी केली. त्याचा वापर करून वेल्डिंग मशीन विकत आणून स्वतः घरी अन्य एका दुचाकीचा चाकाचा उपयोग करून गाडा तयार केला. सदर गाड्यावर तो केळीसह अन्य कोणतेही सामान वाहतूक करता येईल याचा प्रयोग यशस्वी केला. त्याने बनविलेल्या या वाहनावरून जवळपास ५ कुंटलचा माल वाहतूक करता येत असून, या गाड्याला एक लिटर पेट्रोल मागे ५० किमीचा अंतर कापता असल्याचे परमेश्वरणे नांदेड न्युज लाईव्हशी बोलताना सांगितले. 

शहरातून तीनचाकी गाडा फिरताना अनेकजण दुचाकीच्या इंजन, चाके व अन्य साहित्यापासून बनविलेल्या गाड्यातून स्मानाची वाहतूक करताना पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एका भंगार दुचाकीपासून बनविलेल्या गाड्याच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसापासून विविध मालाची वाहतूक करून जवळपास ३ हजाराहून अधिक कमाई केळी आहे. तर एका व्यक्तीने त्याने बनविलेले तो गाडा २० हजारच्या किमतीला खरेदी करण्याचे दर्शविले. परंतु बनविलेले वाहन एक प्रयोग आहे, त्यामुळे याची विक्री न करता आगामी काळात हे वाहन पेट्रोल ऐवजी बैटरीचा उपयोगावर म्हणजे सौर उर्जेवर चालविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच यासाठी वेगळे इंजन बनविण्याचे काम सुरु असून, कमी खर्चात जास्त काम करणारी हि गाडी शेतकरी, व्यापारी यांना उपयुक्त पडेल. असे वाहन लवकरच बनवून शासनाच्या परवानगीने विक्रीस आणले जाईल असा मानस त्याने बोलून दाखविला. 

मंगलवार, 17 नवंबर 2015

शेतकर्याची आत्महत्या

नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकर्याची विषारी औषध प्राषनाणे आत्महत्याहिमायतनगर(प्रतिनिधी)जवळगाव येथील एका ४० वर्षीय अल्पभूधारक शेतकर्याने सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना दि.१७ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकर्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मयत शेतकरी गणेश भुजंगा पवार यांच्या नावे जवळगाव शिवारात ५ एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते शेतीत कापूस, सोयाबीन सारखे पिके घेतात परंतु अल्प पावसामुळे सतत तीन वर्षापासून नापिकी झाली. त्यामुळे तो व्यतिथ होता दरम्यान गत वर्षी मुलीचे लग्न कर्ज काढून केले, यावर्षीच्या शेती पिकावर कर्ज फेडायचे यासाठी काबाडकष्ट केले. परंतु सोयाबीनला म्हणावा तसा उतरारा आला नसल्याने शेतीसाठी खरीपात केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज फिटायचे सोडा उलट डोंगर वधूच लागला, या चिंतेत गेल्या काही दिवसापासून तो होता. दि. १६ रोजी रात्री जगलीला जातो म्हणून शेतात गेला तो घरी परतलाच नाही. सकाळी मालक घरी आले नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता शेतकरी गणेश यांचा मृतदेह दिसून आला. 

घटनेची माहिती मयत शेतकर्याचे भाऊ रामराव भुजंगा पवार यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिस डायरीत कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मयताच्या प्रेताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सायंकाळी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबीयावर दिखाचा डोंगर कोसळला असून, यातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत देवून हातभार लावावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.