NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

शनिवार, 28 फ़रवरी 2015

रब्बी पिकांचे अतोनात नुकसान

मेघ गर्जनेसह हिमायतनगरात अवकाळी पाउस...
ढगाळ वातावरणाने गारपीटची शक्यता... 
जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर 


हिमायतनगर(अनिल मादसवार)शनिवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास व रात्री ७ वाजता मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाउस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतील गहू, हरभरा, करडी, आंब्याचे कैर्यानी लगडलेले फुल गळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अर्धातास चाललेल्या या दमदार पावसामुळे हिमायतनगर येथे सुरु असलेल्या यात्रेकरूंची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यानंतरही आभाळात मेघ गर्जना होणे व वारे सुटणे सुरु असल्याने गारपीट होण्याची शक्यता अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. आगोदरच खरीप हंगामात कमी पावसामुळे नुकसानीत आलेला शेतकरी आता रब्बी हंगामात आवकाळी पाउस झाल्याने पुरता हवालदिल झाला असून, यामुळे जनावरांच्या चार्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 


नांदेड जिल्हा परिसरात मागील महिन्यात ढगाळ वातावरणाने आवकाळी पाउस - गारपीट होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. परंतु वातावरणात बदलाव होऊन आकाश शुभ्र झाले. यंदा पावसाळ्यात कमी पाउस झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्ग कोपणार काय..? असे वाटत असताना जिल्ह्यात पहिल्यांदा निसर्गाने हिमायतनगर तालुक्यात हजेरी लावली. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा न.१,२, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणी, सिरपल्ली, आन्देगाव, पोटा, सरसम, कामारी यासह परिसरात दि.२८ शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचानक विजांचा गडगडाट व सुसाट वार्याने हजेरी लावली. 

त्यातच वादळी वार्याने जोरदार पावसाच्या सरी पडल्यामुळे काढणीला आलेला गहू, करडी, कापून ठेवलेला हरभरा अस्ता - व्यस्त झाला. तर झाडाला लगडलेली आंब्याची कैरी व मोहोर व संत्र मोसंबीचे फळे वादळी वार्याने गळून जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वार्याने फळ बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. या बाबीची शासनाने दाखल घेवून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे. 


यात्रेच्या आनंदावर विरझन 
---------------------- 
मागील आठ दिवसापासून हिमायतनगर येथील म्ह्साहीव्रत्र यात्रा सुरु आहे, आता कुठे यात्रेला रंगत येऊ लागली असताना शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूना मोठा फटका सहन करावा लागला असून, यात्रेचा आनंदावर विरझन पडल्याने लहान थोर यात्रेकरू मंडळीना निराशेत घरी परतावे लागले आहे. 

रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार- लोहारेकर 

------------------------------------ 
आज झालेल्या पावसामुळे रब्बीच्या शेतीपिकांचे नुकसान झाले असून, अगोदरच वैरण नाही, असलेल्या वैरणावर पाऊस व वार्याचा मारा यामुळे ते सुद्धा खराब झाले आहे. आता पुढील काळ कसा काढावा, जनावरांना काय खाऊ घालावे याची चिंता वाढली. तर या पावसामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम होणार असल्याचे शेतकरी दिलीप पाटील लोहारेकर यांनी दिली. 

शासनाने शेतकऱ्यांचा विचार करायला हवा - मुधोळकर 
------------------------------- 
या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, आंब्याचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगामाची मदत अजून हातात पडली नाही. रब्बीची अशा होती. परंतु या अवकाळी पावसामुळे ते हि नुकसानीत आले आहे. उरलेले पिक काढण्यासाठी पाउस थांबणे गरजेचे आहे. असेच ढगाळ वातावरण व कडकडाट चालू राहिला तर गारपीट होऊन शेतकर्याचे पुरते कंबरडे मोडणार आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया साधन शेतकरी प्रभाकर मुधोळकर यांनी दिली.

शिवसैनिक व भीमसैनिक एकत्रहिमायतनगर(वार्ताहर)मौजे सरसम येथे छत्रपति शिवाजी महाराज यांची ३८६ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून, सबंध तालुकाभरातील शिवसैनिक व भीमसैनिक एकत्र एवुन हि जयंती साजरी करण्यात आल्याने यात सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडून आले आहे.

दि.२७ शुक्रवारी सायंकाळी इंदिरा नगर सरसम येथे पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रताप देशमुख सरसमकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमटायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर दादा शेळके, सुनील वानखेडे, आदींची उपस्थिती होती. प्रथमतः शिवाजी महारजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बोलताना शंकर दादा शेळके म्हणाले कि, महापुरुषांना जातीच्या बंधनात बांधण्याचे पाप करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आमचा लढा असून, जातीचा कुपत जाळण्याचे काम आमची संघटना करत असल्याचे सांगितले. तर महापुरुषांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचे आवाहन श्री देशमुख यांनी केले. यावेळी अनेक वक्त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.

भीम सैनिकांनी आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याला शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या जयंतीला शिवसैनिक व भीमसैनिकांचा मेळ एकत्र आल्याने कार्यक्रमाला रंगत आली होती. याच कार्यक्रमात अतुल गायकवाड व संगीता गायकवाड यांच्या संगीत मैफिलीने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गुंडेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजू वाठोरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मा कांबळे, प्रवीण कांबळे आदींसह सर्व भीमसैनिक व शिवसैनिक युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शुक्रवार, 27 फ़रवरी 2015

शेतकरी मार्गदर्शन मेळावा

शिवरायाच्या कालखंडामध्ये शेतकर्‍याचे आत्महत्या झाल्याचे आढळत नाही- बालाजी गाढे 


नांदेड(प्रतिनिधी)नांदेड छत्रपती शिवरायाच्या कालखंडामध्ये आतापेक्षा भयान दुष्काळ पडला होता. परंतु त्या कालखंडामध्ये एकही शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे आढळत नाही त्यामुळे आताचा राज्य सरकारने शिवकालीन शेती विषयक धोरणाचा अवलंब करुन शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्या अशी माहिती प्रसिध्द विचारवंत बालाजी गाढे यांनी पद्‌मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद नांदेड येथे आयोजीत भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा व महाअधिवेशनामध्ये बोलताना व्यक्त केले.

 अध्यक्षस्थानी मराठा सेवासंघाचे प्रदेश आध्यक्ष कामाजी पवार प्रमुख पाहुने म्हणून कृषी परिषदेचे प्रदेश आध्यक्ष संजय दळे पाटील,एकनाथ राव पावडे,प्रा.डॉ.गणेश शिंदे,स्वागत आध्यक्ष अंकुशराव मोरे स्वाभीमानीचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद इंगोले,बालाजी बोकारे,विठ्ठल पावडे, डॉ. रेखा पाटील,इंजि.शेरा पाटील,स्वाभीमानी संभाजी बिगेडचे प्रदेश आध्यक्ष संतोष गव्हाणे ,माधव देवसरकर,गुणवंत आढरे पाटील,प्रतापसिंह मोहिते पाटील,शामसुंदर शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना गाढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे शेती विषयक धोरण कसे होते हे उपस्थित शेतकर्‍यांना पटवून सांगितले शिव कालीन पाणी योजना,शिव कालीन शेती विषयक छत्रपती शिवरायानी शेतकर्‍यांचा मिरचीचा देटालाही हात लावु नका असे सक्त ताकीद आपल्या सेन्याना दिली होती त्यामुळे त्याकाळात शेतकर्‍यांचे मनोबल शेती करतांना उंचावत होती शिवरायाचा काळामध्ये शेतकर्‍यांना सनमानाची वागणूक दिली जात होती अशी माहिती दिली उपस्थित शेतकर्‍यांना गाढे यांनी दिली


दौरा

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा 

नांदेड(प्रतिनिधी)राज्या-चे वित्त  व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड दौ-यावर येत असून त्यांंचा दौरा पुढील प्रमाणे राहील. शनिवार 28 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 9.30 वा. बी-200 या विमानाने चंद्रपुरहून नांदेडकडे प्रयाण. 10.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. आर्यवैश्यळ उपवर वधु परिचय मेळावा कार्यक्रमाला उपस्थिती. 

विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा 

राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौ-यावर येत असून त्यांंचा दौरा पुढील प्रमाणे राहील. रविवार 1 मार्च 2015 रोजी परभणी येथून शासकीय वाहनाने दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 2 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत लोहा, कंधार, मुखेड येथील दुष्कााळी भागाचा दौरा. सायंकाळी 6.30 वा. शासकीय मोटारीने उदगीर जि. लातूरकडे प्रयाण करतील.   

मेळावा : काळाची गरज

उपवर-उपवधु परिचय मेळावा : काळाची गरज !


आज आर्य वैश्य समाजाच्या 43 व्या परिचय मेळाव्याच्या आयोजनाबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे हार्दिक अभिनंदन ! आर्य वैश्य समाजाच्या परिचय मेळावा आयोजनाची बर्‍याच वर्षांपासूनची परंपरा चालू आहे. विशेष करुन नांदेडचा परिचय मेळावा हा दोन रायांसह संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना जोडणारा आहे. आज घडीला वेळ,श्रम, पैसा वाचविण्याच्या दृष्टीने त्यासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी परिचय मेळाव्याप्रमाणेच सामुहिक विवाह मेळावे होणे देखील गरजेचे आहेत. आजही आपल्या समाजात शिक्षणाचे प्रमाण म्हणावे त्या प्रमाणात नसल्यामुळे तसेच बहुतांश व्यक्तींचा उदरनिर्वाहाचे साधन हे व्यापार आहे. आता मात्र बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण शिकून आपल्या समाजातील व्यक्ती व्यापार सोडून इतरही क्षेत्रात आगेकूच करत आहेत. समाजात जुन्या प्रथा, चाली रुढी , परंपरांना विशेष महत्व आहे. समाजाची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्यामुळे तसेच समाजाची संख्या अत्यल्प असल्यामुळे आपल्या आर्य वैश्य समाजाला सुध्दा आरक्षण मिळण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे आणि ती योग्य आहे आणि यासाठी समाजातील सर्वच स्तरातून ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.

विकासाच्या प्रक्रियेत भाग घेत असतांना कोणत्याही एका व्यक्तीने विकास होत नसतो जेंव्हा एक व्यक्ती, एक कुटूंब, एक समाज, संपूर्ण समाज तसेच संपूर्ण गाव, संपूर्ण शहर, संपूर्ण राष्ट्र त्याप्रक्रियेत सहभागी होईल तेंव्हाच विकास होत असतो. आधुनिकीकरणाच्या सोशल मिडीयाच्या युगामध्ये आज आपण आजू- बाजूला असून सुध्दा खूप लांब गेलोत त्याचप्रमाणे पैसा कमविण्यासाठी तसेच भौतिक सोई-सुविधा मिळविण्याच्या नादात आपण स्वत:पासून खूप दूर चाललेलो आहोत हे आता जाणवू लागले आहे. आज घडीला पैसा आहे मात्र वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या आधुनिक युगात मुला-मुलीचे लग्न जुळविणे हा मोठा आव्हानात्मक प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. एकमेकाला अनुरुप जोडपे शोधने हे अवघड काम असून त्यात वधु आणि वर पित्याचा खूप वेळ वाया जात आहे सद्यस्थितीत समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनइर, अभियंता,लेखक, उद्योगपती आदी क्षेत्रात समाजातील मुलं-मुली स्वत:चे प्रतिनिधीत्व स्वत:च करतांना दिसत आहेत ही बाब समाजातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे.
विवाहाच्या बाबतीत अनेक प्रचलित परंपरा आज समाजात आहेत. वधु - वर परिचय मेळाव्यात येवून मुला-मुलीने परिचय देणे, सामुहिक विवाह मेळाव्यात लग्न करणे यासाठी संकुचित पणा काही प्रमाणात जाणवत आहे. परिचय मेळाव्यात येवून स्वत:चा परिचय देणे आजही काही जणांना संकोच वाटत आहे. खरे तर अनेक वधु आणि वरपिता आपल्या मुला-मुलींना अनुरुप जोडीदार निवडण्यासाठी बेजार आहेत. निवड करतांना कधी- कधी वर्ष - दोनवर्षही जातात त्यामुळे वेळ, श्रम, पैसा यांचा फार मोठा अपव्यय होतो. आपल्या आसपासच उचित आणि अनुरुप जोडीदार असतो पण केवळ आपणांस माहिती नसल्यामुळे तसेच संकुचित पणामुळे संबंध जुळले जात नाहीत म्हणून तर समाजाचा वेळ, पैसा, श्रम वाचविण्यासाठी वधु-वर परिचय मेळाव्याची नितांत गरज आहे.

 आजही आपल्या समाजातील बहुतांश समाजबांधव हे आपले दैनंदिन जीवनात पारंपारिक रुढी - परंपरा, जुन्या प्रथा, चाली-रिती पाळतात. विवाह संस्कार ही कुटूंबसंस्थेतील अत्यंत संवेदनशिल बाब समजली जाते. आपल्या समाजात उपवर- उपवधूंना लग्नाच्या बेडीत अडकवण्यापूर्वी नाते संबंध, पंचांगातील गुण आदी पाहून या की पारंपारिक रुढी परंपरेनुसार चालत आलेल्या पध्दतीनुसार विवाह जुळविले जातात या गोष्टी आजच्या सोशल मिडीयाच्या युगात कालबाह्य वाटत असल्यातरी याची नोंद घेणे गरजेचे आहे. सुशिक्षित ज्ञानसंपन्न पिढीने आता जुन्या कालबाह्य परंपरा सोडून नव्या विचारांची कास धरणे गरजेचे आहे यात उपवर-उपवधूंचे व्यक्तीमत्व , शिक्षण, वर्तूणूक, परिस्थितीशी जुळवूण घेणारे तसेच एकमेकांविषयी सामंजस्य , आदरपणासोबतच वरीष्ठांना मान सन्मान देणारे असावेत मात्र सद्यपरिस्थितीत दिखावूपणा व भौतिक सुख-सोई सुविधांपुढे वरील बाबींकडे साफ दुर्लक्ष होत आहे असे दिसते.

उपवर - उपवधु परिचय मेळाव्यामुळे वर-वधूंसोबतच इतर नातेवाईकांचाही अल्पसा का होईना एकमेकांना परिचय होतो. वधु-वर परिचय मेळाव्यात अगदी मन-मोकळे पणाने एकमेकांना पाहता येते. सर्वांच्या समोर येऊन परिचय दिला, शिवाय आपल्या जोडीदाराविषयी अपेक्षा व्यक्त केल्याने परस्परांच्या आवडी-निवडी कळु शकतात. स्वत: परिचय दिल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. भविष्यातील अनेक कल्पना स्पष्ट होतात. परस्परांची शैक्षणिक पात्रता जुळल्याने पुढील संबंधासाठी मोकळ्याापणाने बोलता येत म्हणून तर वधु-वर परिचय मेळावा ही काळाची गरज बनली आहे. उपवर - उपवधू परिचय मेळाव्याच्या आयोजना मागचा चांगला उद्देश सफल करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

                                                                                                                      - विनोद विलासराव महाजन

“योजना समाधानाची -वाटचाल आत्‍मविश्‍वासाची”

आत्महत्त्या रोखण्यासाठीचे अभियान, 2 मार्च पासून सुरवात
शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी नांदेडच्या जिल्हा प्रशासनाचे विशेष समुपदेशन अभियान


नांदेड(अनिल मादसवार)जिल्‍ह्यामध्‍ये शेतक-यांचे मनोबल उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समुपदेशन अभियानाची आखणी केली आहे. या अभियानाची सुरवात सोमवार 2 मार्च, 2015 पासून होणार आहे. ग्रामीण भागामध्‍ये विशेषत: ज्‍या परिसरामध्‍ये शेतकरी आत्‍महत्‍यांचे प्रमाण जास्‍त आहे अशा परिसरामध्‍ये शेतकरी व शेतमजूर कुटूंबाचे मनौधैर्य वाढविण्‍यासाठी त्‍यांचे समुपदेशन करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. याकरिता अध्‍यात्‍मीक संदर्भाचा आधार आणि विविध योजनांची माहिती यासह शेतकऱ्यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्यासाठी योजना समाधानाची - वाटचाल आत्‍मविश्‍वासाची शेतकरी आत्‍महत्‍या थांबवण्‍यासाठी विशेष समुपदेशन अभियान सुरु करण्यात येत आहे.  सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानांतर्गत समाधान योजनेत या अभियानाचा समावेश असेल, असे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाच्‍या माध्‍यमातून शेतक-यांचे प्रबोधन करीत शासनाच्‍या विविध योजनांची माहिती देऊन तशा सुविधा त्‍यांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे व त्‍याचबरोबर शासन व शासकीय यंत्रणा आपल्‍या सोबत असून कुठल्‍याही अडचणी, संकटांना न घाबरता खंबीरपणे परिस्थितीवर मात करावी हा संदेश शेतक-यांपर्यंत पोहचवला जाणार आहे. जिल्ह्यात 2012 मध्‍ये जिल्‍हयात 39 शेतक-यांनी, 2013 मध्‍ये 46 शेतक-यांनी आत्महत्त्या केल्याची आकडेवारी आहे. दुर्दैवाने ही संख्या 2014 मध्‍ये 117 वर पोहचली आहे. यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्‍ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगांव, बिलोली या तालुक्‍यामध्‍ये अधिक आहे. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने अभियानाचे नियोजन केले आहे.

या शेतकरी आत्‍मविश्‍वास जागृती अभियानात पहिल्या टप्प्यात प्रत्येक उपविभागातील एक गाव निवडण्यात आले आहे. कार्यक्रम दोन ट्प्‍यात घेण्‍यात येईल. पहिल्‍या टप्यामध्‍ये आध्‍यात्मिक तसेच मानसशास्‍त्रीय संदर्भाचा आधार घेत जीवन यशस्वी जगण्‍या संदर्भात मार्गदर्शन करण्‍यात येईल, समुपदेशन करण्‍यात येईल. यामध्‍ये समाजातील कांही मान्‍यवर व्‍यक्‍तींची मदत घेण्‍यात येईल त्‍याचबरोबर यशस्‍वी शेतक-यांची यशोगाथा त्‍यांचेच मुखातून सांगण्‍यात येईल. या अभियानात अध्यात्मिकस्तरावरून समुपदेशन व्हावे यासाठी संत तुकडोजी महाराज संस्थानाचे डाँ. उद्धव गाडेकर यांचे किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रगतीशील शेतकरी डाँ. शिवाजी शिंदे यांच्यासह शेतीत उत्तमोत्तम प्रयोगशीलता राबवणारे शेतकरी, शेतीनिष्ठ आणि तज्ज्ञांची व्याख्याने, अनुभव कथन असे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासोबतच शासनाच्‍या महत्‍वाच्‍या विभागाच्‍या शेतक-यांना उपयुक्‍त असलेल्‍या योजनांची माहिती देणारी तालुकास्‍तरीय किंवा जिल्‍हास्‍तरीय अधिकारी त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या विभागाच्‍या योजनांचा पूर्ण अभ्‍यास करुन माहिती देण्‍याकरिता हजर ठेवण्‍यात येईल. शासनाच्‍या विविध विभागाच्‍या उदा. कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्‍धव्‍यवसाय विभाग, सहकार विभाग, आरोग्‍य विभाग या सारख्‍या महत्‍वाच्‍या विभागाच्‍या अधिका-यांकडुन योजनांची माहिती उपस्थितांना देण्‍यात येईल. त्‍याचबरोबर शक्‍य झाल्‍यास कांही माहिती पत्रक किंवा अर्ज इत्‍यादीचे वाटप त्‍या ठिकाणी केले जाईलआरोग्‍य विभागा मार्फत आरोग्‍या संदर्भातील योजना सांगून आरोग्‍य तपासणीसाठी कार्यक्रम सुध्‍दा त्‍या ठिकाणी घेतले जाईल.

कार्यक्रमाच्‍या जबाबदारीचे वाटपही विविध स्तरावर केले जाणार आहे. जेणेकरून विविध घटकांचा सहभाग वाढेल. त्या-त्या मंडळातील किंबहुना तालुक्‍यातील, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित राहतील. वेगवेगळ्या विभागाच्‍या वेगवेगळया योजनांची मदत माहिती दर्शविणारे स्‍टॉल, कांही माहिती पत्रिका इत्‍यादी व्‍यवस्‍था केली जाणार आहे.  ग्रामीण रुग्‍णालयाचे अधिक्षक त्‍याचबरोबर तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य, त्‍या बरोबरच कांही स्‍वयंसेवी संस्‍था व खाजगी डॉक्‍टर्स यांची मदतीने त्‍या ठिकाणी आरोग्‍य तपासणी शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. 

‘‘जिवनातील आठवणीचा प्रवास’’

इंजि.शिवाजीराव नारायणराव सुर्यवंशी
सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता


दि.28 फेब्रुवारी 2015 सार्वजनिक बांधकाम खात्यातील नांदेड विभागातून इंजि.एस.एन.सुर्यवंशी साहेब आज आपल्या शासकीय सेवेची 33 वर्ष 6 महिणे एवढी प्रदीर्घ काळ सेवा करुन सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जीवनपटातील आठवणीचा हा प्रवास. हदगाव तालुक्यातील कामारी सारख्य खेड्यात स्वातंत्र्यपूर्व निजाम काळात, धर्म विवेक व शिक्षण यासारख्या कलागुणांची जन्मजात आवड असलेली, पांडूरंगराव शिरफुले सारखे शिक्षणमित्र राहिलेले कै.साहेबरावजी बारडकर व केशवरावजी धोंडगे सारख्या निस्वार्थ सेवा करणारे लोकनेते यांच्या नेहमीच सानिध्यात राहणारे धर्म व सहिष्णुनतेचा वसा जपून शिवाजीरावांचे वडील कै.नारायणरावजी सुर्यवंशी व आई इंदिराबाई यांच्या पोटी 1957 साली शिवाजी हे रत्न जन्माला आहे. रत्न या शब्दाचा उल्लेख एवढ्यासाठीच धर्म व सहिष्णुनता, विवेक व शिक्षण या तीन्ही विषयांचा परिपूर्णं वसा शिवाजीरावांनी आपल्या जीवनात अंगीकारुन जीवन प्रवासाला सुरुवात केली.

Flexible Personality, To Finish the work, First Start Most Outstanding Bridge National Award 1997
मुळातच कौटूंबिक शिक्षणाची आवड असलेल्या शिवाजीरावांनी बी एस सी मॅथस, बी ई सीव्हील, एम आय ई चॅर्टड इंजिनइर सारख्या पदव्या घेवून 1981 साली सहजगत्या सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर येथे सहाय्यक अभियंता या पदापासून शासकीय सेवेची सुरुवात केली. अतिशय कुशाग्र बुद्धी, विचाराची सर्वसमावेषकता, शैक्षणिक पात्रता या सारखी गुणवत्ता अंगी आहे. 1980 ते 85 चा काळ शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वाभिमान, बुद्धीमान व मेहनतीची कदर करणार्‍यांचा होता. त्या काळात मलाही अशीच सहज शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली. त्या काळात पैशापेक्षा बुद्धी व गुणवत्तेलाच अधीक संधी असत. आज दुर्देवाने असे चित्र फारच दुर्मिळ. शिवाजीरावांच्या शासकीय सेवा काळाच्या प्रवासाची सुरुवात सहाय्यक अभियंता श्रेणी-2 ते उपविभागीय अभियंता, भोकर पासून ते नांदेड - परभणी-मुंबई-पाथरी-माहूर-वसमत-मुखेड-नायगाव पर्यंत अविरतपणे करत असतांना त्या काळात अतिशय कुशाग्र बुद्धीचे मेहनती व प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असणारे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता इंजि.अंबडकर, कंधारे, निर्मले, पसारकर, घोलसंघी, एम.एम.खान, मेंढेकर, तुंगे, अविनाश धोंडगे, नवले, राजपूत साहेबांचे मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभले. याचा आवर्जुन उल्लेख करावाच लागेल. भोकर विभागातील नक्षलग्रस्त भागातील रस्ते विकासाचा आरखडा तयार करुन अनुदानासह मंजूरी घेणे, विशेष प्रकल्प विभाग ठाणे अंतर्गत ठाणे कळवा रस्त्यावरील खाडी पुलाची बांधणी, पाथरी-लिंबा-विटाळ-सोनपेठ रस्त्यावरील विटा गावाजवळ गोदावरी नदीवरील पुल बांधणी. पाथरी येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम, वसमत येथील न्यायालयीन व स्त्री रुग्णालयाचे बांधकाम, पेनुर येथील गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम, खाजगीकरणाअंतर्गत शिरुर ताजबंद-मुखेड-नरसी-बिलोली, नरसी-देगलूर रस्ता, मुखेड येथील आयटीआय इमारत व मुख्य प्रशासकीय इमारत उभारणी, मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार महामहार्गावरील अतिक्रमणे काढणे यासारखे असंख्य कामे त्यांच्या काळात प्रगतीपथावर राहून पुर्णंत्वाच्या मार्गावर असल्यामुळे त्यांच्या कष्टाची व कर्तव्यनिष्ठतेची जाण देत उभी आहेत. या वृत्तीमुळे व त्यांच्या कार्यतत्परतेमुळे ठाणे, पाथरी येथील त्यांच्या कामाच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे वेळोवेळी त्यांना , मराठी पत्रकार संघ हिमायतनगर तर्फे उत्कृष्ठ सेवा पुरस्कार, गुरुवर्यत एम.पी.भवरे, कामाटीकर स्मृती पुरस्कार-2014 तर्फे कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, तत्कालिन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने महामार्गावरील अतिक्रमणे वेळेत काढल्याबद्दल अभिनंदनपर पत्र देवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवाय खात्यातर्फे अतिउत्कृष्ट सेवा म्हणून अगाऊ वेतनवाढही देण्यात आली. पूर्वी लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी सार्वजनिक विकासात्मक व विधायक कामासाठी अधिकारी व कर्मचार्‍यावर दबाव टाकायचे. आज वैयक्तीक विकासासाठी दबावतंत्राचा जास्तीत जास्त वापर प्रशासकीय कामात आपणास दिसून येतो. अशाही परिस्थितीत न डगमगता आपल्या शिवाजीरावांनी सेवा काळात सार्वजनिक विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले.

अशा सकारात्मक जीवनशैलीचा सर्वांगाने विचार करणारे आपले शिवाजीराव आजही तरुणच आहेत. केवळ वयामुळे ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा देह व मन अजूनही छत्रपतीसारखे तरणेबांड आहे. अशा कर्तव्यनिष्ठ, बुद्धीमान, मनमिळावू स्वभावाच्या अधिकार्‍यामुळे काही अंशी का होईना बांधकाम खात्याची प्रतिष्ठा शाबुत ठेवण्यास मदत झाली. हीच विचाराची परंपरा आपण सर्वांनी मिळून वृद्धींगत केली तर बांधकाम खाते पूर्वीसारखे नावारुपास आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आचारविचाराची परंपरा अशीच वृद्धींगत करुन महाराष्ट्रातील बांधकाम खात्याला भ्रष्टाचार मुक्त व विकासात्मक समृद्धीकडे नेण्याचा खारीचा का होईना सहभाग आपण सर्वजण घेवू या. त्यांच्या या जीवनप्रवासातील थोडासा सहवास मलाही लाभला. त्याबद्दल मी नशिबवानच म्हणावे लागेल. उच्च विद्याविभूषीत मुलगा व मुली, अतिशय शालीन मनमिळावू कुटूंब उत्सल असलेल्या त्यांच्या सहजीवनदायनी परिवाराने भरलेला शिवाजीरावांचा परिवार हाही इतरांना हेवा वाटावा असाच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, कर भला । होगा भला अतं भले का भला । आपल्या शिवाजीरावांच्या जीवनप्रवासातील आठवणीची ही शिदोरी सहहृदय, प्रेमपूर्वक त्यांना समर्पित करुन बांधकाम खात्यात अशीच विश्वासार्ह्यता जपून कर्तबगार पिढी निर्माण व्हावी म्हणूनच या जीवनप्रवासातील शब्द जुळविण्याची ही तळमळ व खटाटोप. त्यांना व त्यांच्या कुटूंबियांच्या क्षेमकल्याणासाठी व दिर्घायुष्यासाठी सदभावना व शुभेच्छा व्यक्त करुन त्यांचे सर्वांचे भविष्यही असेच तेजोमय होवो हीच मनोमन सदिच्छा ठेवून या जीवन प्रवासातील आठवणींना लाल सलाम करतो.
                                                                           जीवनाच्या आठवणीतील सहप्रवासी -कॉ.के.के.जांबकर

संगीतशंकर दरबार

डॉ.राम देशपांडे यांची दमदार मैफल


नांदेड(प्रतिनिधी)गुरुवारी सायंकालीन सत्राचा समारोप डॉ.राम देशपांडे यांच्या दमदार मैफिलीने झाला. परिपूर्ण गायकीचा प्रत्येय नांदेडकरांनी घेतला. प्रांरभी संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा कार्यक्रमाचे संयोजक अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार डी.पी.सावंत, नरेंद्र चव्हाण, गुलाबराव भोयर, शिलाताई भोयर, किशोर पाटील, पुष्पा पाटील, पं.नाथराव नेरलकर, सुनिल नेरलकर यांची उपस्थिती होती. 

उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर राम देशपांडे यांनी गायला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी यमनकल्याण राग सादर केला. जिया मानतनाही या विलंबित ख्यालात संथ पध्दतीने आलापी करीत रागाचे प्रस्तुतीकरण केले. त्यानंतर त्यांनी गायलेला तराना श्रोत्यांच्या पसंतीला उतरला. सोहनी रागातील ‘जियरारे’ही बंदीश त्यांनी अतिशय आर्ततेतून सादर केली. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली सावरीया या ठुमरीने श्रोत्यांना आनंदीत केले. या भवनातील गित पुराणे हे नाट्यगित व त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा भैरवीत आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना हा अभंग सादर केला. मैफिलीला साथसंगत अजय जोगळेकर (हार्मोनियम), स्वप्नील भिसे (तबला) यांची होती. कार्यक्रमा दरम्यान त्या दोघांची झालेली जुगलबंदी टाळ्या मिळवून गेली. डॉ.राम देशपांडे यांच्या मैफिलीपूर्वी महेंद्र टोके यांचे गायन झाले. त्यांनी पुरीयाकल्याण हा राग सादर केला. त्यांना साथसंगत जयंत नेरळकर, शशांक शहाणे यांची होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विश्वाधार देशमुख यांनी तर आभार सुनिल नेरलकर यांनी मानले. डॉ.राम देशपांडे यांची जोरकस मैफल नांदेडकरांच्या कायम स्मरणात राहिल, हे मात्र निश्चित. 

दक्षिणकाशीत नाममहिमेचे गायन


नांदेड(प्रतिनिधी)श्री गुरुगोविंदसिंघांच्या पावन भूमीत शुक्रवारी पहाटेच्या मैफिलीत संत नामदेवांच्या चरित्राचे गायन झाले. सुप्रसिध्द गायक रघुनंदन पणशीकर, गायिका अंजली मालकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. पं.विकास कशाळकर, मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबध्द केलेली नामदेवांवरील अभंग त्यांची चरित्रगाथाच होती.

 प्रथम नमन करु गननाथा या नांदीने सुरु झालेल्या कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या पारंपारिक आरतीने करण्यात आली. शिंपीयाच्या कुळी जन्म माझा झाला हा अभंग रघुनंदन पणशीकर यांनी सादर केला. अनंत रुपाचे सागर हा पुरीया धनश्री रागातील अभंग दाद मिळवून गेला. श्रीमुख साजिरे, कुंडलेगोमटी, एके हाती टाळ, एका हाती दिंडी हे अभंग अंजली मालकर यांनी गायिले. जय जय राम कृष्णहरीचा गजर करण्यात आला. अंजली मालकर यांनी गायिलेली परब्रम्ह निष्काम तो हा ही गवळण अतिशय वेगळ्या ढंगाची होती. निवेदक गजानन परांजपे यांनी संत ज्ञानेश्वर समाधीचा प्रसंग वाचिक अभियनाव्दारे साकारला. रघुनंदन पणशीकर यांनी ‘मै अंधुलेकी टेक, तेरा नाम खुंदकारा’ही संत नामदेवांची पंजाबी भाषेतील रचना रघुनंदन पणशीकर यांनी अतिशय तन्मयतेने सादर केली. प्रेमर्ंिपसे पडले अंगी, तिने छंदे नाचू रंगी हा नामयाचा अभंग मालकर यांनी गायला. अवघाच संसार करीन सुखाचा, जरी झाला दुःखाचा दुर्धर हा भैरवी रागातील या अभंगानंतर पांडूरंगाची पारंपारिक आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुण्‍यतिथी

 कै. सौ. कुसूमताई शंकरराव चव्‍हाण यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त माजी मुख्‍यमंत्री अशोकराव चव्‍हाण, आमदार सौ. अमिता चव्‍हाण व परिवाराच्‍यावतीने धनेगाव येथील समाधी स्‍थळावर आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी वासुदेवानीही कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण, सौ. कुसूमताई चव्‍हाण यांना त्‍यांच्‍या नावाने समाधीस्‍थळावर दान पावलेचा संकल्‍प सोडला. छाया- महेश होकर्णे, सारंग नेरळकर नांदेड

रमाई जन्मोत्सव

माता रमाई जन्मोत्सवानिमित्त आज सांस्कृतिक कार्यक्रम


नांदेड(प्रतिनिधी)माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवा निमित्त शहरात शनिवारी (दि.28) विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक खा. अशोक चव्हाण व अध्यक्षस्थानी आ. डी.पी. सावंत हे राहणार आहेत, असे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (दि.28) सायं. 6.30 वा. पावडेवाडी नाका जवळील छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मारक मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ख्यातनामगायक प्रा. अविनाश नाईक निर्मित्त व मिशन ए भिमक्रांती प्रस्तूत ‘माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं’ ह्या भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तत्पुर्वी दलित साहित्यीक व लेखक प्रा. दु.म. लोणे हे रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार आहेत. 

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अध्यक्षस्थानी नांदेड उत्तरचे आ. डी.पी. सावंत हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून आ. अमर राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार, जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, नांदेड महानगरपालिकेचे नूतन आयुक्त सुशील खोडवेकर, वार्डाच्या नगरसेविका सौ. वैशालीताई देशमुख, डॉ. सौ. शिला कदम, नगरसेवक किशोर भवरे, शंकर गाडगे, सुभाष रायभोळे, विठ्ठल पाटील डक, दैनिक प्रजावाणीचे व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे गोवर्धन बियाणी, कार्यकारी अभियंता शैलेश जाधव, सहाय्यक उपायुक्त सादिक, उपअभियंता सतीश ढवळे, सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. माता रमाई जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार भेदेकर, उपाध्यक्ष मिलिंद सिरसीकर, निमंत्रक विमलताई पंडीत, सुरेश हाटकर, संजय कौठेकर, राजू जोंधळे, ऍड. सुमेध टेंभूर्णीकर, प्रविण वाघमारे, अशोक वायवळे, संभा गच्चे, भीमा धम्माकर, अशोक कांबळे, प्रशांत नरवाडे, विक्की पोटफोडे आदी परिश्रमघेत आहेत.

मराठी जागतिक दिना

भाषाविकासासाठी मराठीचे सामाजिक स्थान बळकट होणे महत्त्वाचे


मराठी भाषेचा विकास व्हायचा असेल तर तिचे समाजव्यवहारातील स्थान बळकट झाले पाहिजे. त्यामुळे एकाचवेळी स्थानिक बोली व प्रमाणबोली यांची जोपासना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

मराठी भाषादिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात आयोजित कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवी जगदीश कदम होते तर यावेळी दै. उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर, देविदास फुलारी, डॉ. रमेश ढगे, डॉ. केशव देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस आर.आर. पाटील, गोविंद पानसरे, इसाक मुजावर, रमेश राऊत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’य कवितासंग्रहाचे व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी संयोजन केलेल्या दै. उद्याचा मराठवाडाच्या ‘मराठी भाषा विशेष’पुरवणीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

पुढे डॉ. विद्यासागर म्हणाले, मराठी भाषेमध्येही विज्ञानासहित सर्व शिक्षण घेता येते. तरीपण मराठीत शिक्षण घेने ही कमीपणाची भावना आपल्या मराठी मानसाच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यास शिक्षण देऊन समाजामध्ये आपली खोटी प्रतिमा जपण्याचे काम आपल्याकडून होत आहे. मराठीत शिक्षण घेतल्यामुळेच आपली संस्कृती टिकेल व जोपासली जाईल.

आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी मराठी भाषेतूनच शिक्षण घ्यावे, असे अवाहनही यावेळी त्यांनी केले.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कविसंमेलनात देवीदास फुलारी, महेश मोरे, सुचिता खल्लाळ, मनोज बोरगांवकर, अदिनाथ इंगोले, अशोककुमार दवणे, प्रकाश मोगले, विनायक पवार, वैजनाथ अनमुलवाड, विनायक येवले, योगिनी सातारकर, शंकर राठोड, राजाराम झोडगे, अंकुशकुमार दवणे यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन विनायक पवार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. केशव देशमुख यांनी केले तर आभार डॉ. भगवान जाधव यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. वैजयंता पाटील, डॉ. शैलजा वाडीकर, अनिकेत कुलकर्णी, डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, झिशान अली, निना गोगटे, एन. एल. भंडारे, रमेश कदम, सरिता यन्नावार यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

लाल कंधारी जोडी अव्वल

परमेश्वर यात्रेच्या पशुप्रदर्शनात कांडलीच्या सूर्यवंशी यांची लाल कंधारी जोडी अव्वल 


हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाला दिवसेदिवस रंग चढु लागला असुन, दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या पशु प्रदर्शनात आकर्षक अश्या बैलजोड्या, संकरीत गाय, गावरान कालवड, लाल कंधारी गोरे व गावरान गाई आदिंसह शेकडो पशुपालकांनी सहभाग नोंदवीला होता. प्रदर्शनात आलेल्या पशुंची पहाणी पर्यवेक्षक पशुवैद्यकीय अधिका-यांनी करुन योग्य अश्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.  

या स्पर्धेमध्ये गावरान बैलजोडीतुन अरविंद भाऊराव सूर्यवंशी यांच्या लाल - कंधारी बैलजोडीस प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक देण्यात आले. व्दीतीय बक्षीसाचे मानकरी परमेश्वर राजांना तांद्रावाड  पावणेकर, तृतीय पारीतोषीक श्री रमेश दिगांबर शिंदे सरसम यांच्या बैलजोडीस देण्यात आला आहे. लाल - कंधार गावरान गो-हयामध्ये प्रथम क्रमांक मुक्तीराम किशनराव देवकते, हसूल ता.कंधार, दुसरा क्रमांक बालाजी मारोती पांडूरणे बचोती, ता.कंधार, तिसरा क्रमांक संग्राम संभाजी मुस्तापुरे माळाकोळी, ता.लोहा यांना देण्यात आले.

गावरान लाल - कंधारी गाईच्या गटात - प्रथम बक्षीस संटी कप्पलवाड पवना, व्दीतीय सचिन संग्राम मुस्तापुरे माळाकोळी, ता.लोहा, तिसरा क्रमांक दत्ता भोजन्ना कोमलवाड सिबदरा या पशुपालकास देण्यात आला. गावरान कालवडीमद्ये - प्रथम क्रमांक विश्वनाथ देवराव भूत्ते उमरज, ता.कंधार, दुसरा क्रमांक रामचंद्र व्यंकटी घुगे, संगमवाडी ता.कंधार, व्यंकटेश रामेश्वर सुर्याकाम्बले रा.मालाकोली, ता.लोहा यांना देण्यात आला. संकरीत गाईच्या स्पर्धेत - प्रथम - गजानन बाबुराव बासेवाड, आन्देगाव , व्दीतीय - शे.रहेमान शे.मिय्या हिमायतनगर, जय्वानाता नारायण वासुदेव सिरंजनी यांना देण्यात आले. तसेच अन्य विशेष पशुंच्या पालकांना पशुंची निगा व ठेवन या अनुसार उपस्थितांकडुन उत्तेजनार्थ बक्षीस मंदिर ट्रस्टच्या वतीने वितरण करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून पशुवैदयकीय अधिका-यांसह अन्य मान्यवरांचे स्वागत परमेश्वर ट्रस्ट कमेटीच्या वतीने श्रीफळ देऊन करण्यात आले. यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने , भोकरचे पशुवैद्यकीय अधिकारी एस.जी.जिंकलोड, किनवटचे व्ही.शिरसेवाड, हिमायतनगरचे डॉ.व्ही.एन.बीराजदार, हदगावचे डॉ. एस.जी.चव्हाण, डॉ.पंकज लोखंडे, डॉ. माघाडे साहेब, श्री के.जे.बोयवार, गोपाळ कदम, एस.आर.शिंदे आदिंसह ट्रस्ट समीतीचे उपाध्यक्ष श्री महावीरचंद श्रीश्रीमाळ, राजेश्वर चिंतावार, प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, देवीदास मुधोळकर, संभाजी जाधव, आनंता देवकते, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, विजय शिंदे, नारायण करेवाड, ज्ञानेश्वर शिंदे, अवधुतराव बाचकलवाड, विठ्ठलराव चव्हाण, नारायण बास्टेवाड, पांडुरंग चव्हाण, संतोष गाजेवार, मुन्ना जन्नावार, बाळु मारुडवार, तुकाराम मुधोळकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरग गाडगे, सल्लागार प्रकाश जैन, नांदेड न्युज लाईव्हचे संंपादक तथा सचिव अनिल मादसवार, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, परमेश्वर शिंदे, संघटक कानबा पोपलवार, कोषाध्यक्ष अनिल भोर, दिलीप शिंदे, असद मौलाना, धम्मा मुनेश्वर, माधव यमजलवाड,  आदिंसह कंधार, लोहा, हिमायतनगर, हदगाव, आदीसह अनेक तालुक्यातील शेतकरी वांधव व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कृषी प्रदर्शनात फळ - भाज्यांची आवक 
---------------------
श्री परमेश्वर यात्रा महोत्सवात आयोजीत कृषी प्रदर्शनात भोकर, हिमायतनगर, हदगाव येथील  बहुतांश शेतक-यांनी वीवीध प्रकारच्या फळ भाज्या आणुन उत्सफुर्तपने सहभाग नांेंदवीला आहे. यात भोपळा,रामफळ, हाळद,गाजर, गोबी, मीरची, मका, संत्रा- मोसंबी, तमाटा, अंब्याच्या कै-या, चिकु, केळी, डाळींब, काकडी, मुळा, सुर्यफुल, कांदा - लसुन, टरबुज, पपई आदी फळभाज्या प्रदर्शनात माडल्या होत्या.या सर्व पीक - फळांची पहाणी करण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली होती. या फळ - भाज्याच्या कृषी प्रदर्शनाची मांडणी पंचायत समीतीचे कृषी अधिकारी पुंडलिक माने , अव्दैत देशपांडे यांनी केली होती. परीक्षण मंदिर समीतीच्या लोकांनी करुन प्रथम व्दितीय क्रमांक निवडण्यात येऊन उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सोमवार, 23 फ़रवरी 2015

दगडाने ठेचून क्रूरहत्या

टेंभी रस्त्यालगत शीवारात अज्ञात युवकाची दगडाने ठेचून क्रूरहत्या  

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे टेंभी रस्ता शिवारात एका अज्ञात युवकाची दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याची घटना दि.२३ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, युवकाची हत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देवून श्वान पथकाला पाचारण करून तपासाला गती दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, किनवट - भोकर रस्त्यावरील असलेल्या हिमायतनगर शहरात  शहरापासून ४ कि.मी.अंतरावर असलेल्या टेंभी रस्त्यालागतच्या शिवारातील शेतात दि.२३ सोमवारी एका अज्ञात युवकाचे मृतअवस्थेत प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनि घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सदरचे प्रेत हे पालथ्या अवस्थेत होते. प्रेताच्या बाजूलाच एका कंपनीचे १० रुपयाचे सीम व्हावचर, आगपेटी, देशी दारूच्या बॉटल, अंगावर लाल रंगाची ती शर्त, धुरकट रंगाची पैंट, उंची १७० से.मी., रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह आणि त्याचे पडलेले दात आदी वर्णन पोलिसांनी केले आहे. अज्ञात मारेकर्यांनी मृतक युवकाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहर अत्यंत क्रूरपणे कोणत्या तरी साहित्याने ठेचून करण्यात आला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. प्रेताच्या तोंडात, नाकात माती गेल्याने चेहरा छिन्न विच्छिन्न झाला असून, त्याची ओळख पटविणे पोलिसांना आव्हान बनले आहे. मयत युवक हा अंदाजित ३५ वर्ष वय असून, कोण्यातरी वैक्तिक कारणाने याचा खून झाला असावा असा कयास पोलिसांनी बांधून पंचामना सुरु केला. 

दरम्यान अज्ञात व्यक्तीच्या हत्या झाल्याची व प्रेत आढळून आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री चव्हाण यांनी वरिष्ठांना कळविले. त्यावरून दुपारी भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकाला पाचारण करून जप्त केलेल्या साहित्याच्या दुर्गंधीच्या दिशेने तपास सुरु करण्यात आला. कैंडी नामक श्वानाने संपूर्ण परिसर फिरून राज्य रस्ता गाठून अज्ञात मारेकरी हे कोण्यातरी वाहनाने फरार झाल्याचे संकेत दिले. 


पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्यामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात येवून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवीण्यात आले आहे. सध्या तरी या हत्येच्या घटनेचे कोडे उलगडले नसून या खुनाचा तपासाला गती देवून लवकरात लवकर छडा लाऊ असे आश्वासन डी. वाय. एस. पी. योगेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

आळ्या जाळ्या अन सडलेला तांदूळ

आळ्या जाळ्या अन सडलेला तांदूळ

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथून जवळच असलेल्या सवना ज.येथील जी..शाळेला पुरविल्या गेलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदुळात आळ्या आणि जाळ्या लागलेल्या असल्याचे आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविल्या जातो. परंतु अलीकडच्या काळात हा आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घटक ठरणारा असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी पुरविला जाणार आहार जीवघेणा ठरू लागला आहे. शालेय पोषण आहारातील भोजन घेतल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होणे, उलट्या, मळमळ किंवा आजारी पडल्याच्या अनेक घटना आजवर विविध ठिकाणी घडल्या आहेत. तरी सुद्धा यातून शासनाला अजून शाहन पण सुचल्याचे दिसून येत नसल्याचे सवना जं. येथील निकृष्ठ तांदुळाच्या घटनेवरून दिसून येत आहे. सदर धन्य हे शासकीय गोदामातील असून, महाराष्ट्र राज्य कन्जुमर फेडरेशन लि.मुंबई मार्फत चढावर नामक पुरवठादार नांदेड जिल्ह्याला पुरवठा करत असल्याचे समजते.

हिमायतनगर तालुक्यातील सवना जं.येथील जी.प.प्राथमिक शाळेला दि.२३ रोजी पुरविण्यात आलेला शालेय पोषणाच्या आहाराचा तांदूळ आळ्या- जाळ्या व सडका असल्याचे आढळून आल्याने हा तांदूळ विद्यार्थ्यांनी खायचा कसा..? शालेय पोषण आहार आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कि बिघडवण्यासाठी असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालाकातून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवण्यात येत असल्या तरी शासकीय योजना सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उत्तम असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या किती फसव्या असतात हे या निकृष्ठ तांदुळाच्या घटनेवरून दिसून येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

सदरील निकृष्ठ तांदुळाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री श्याम रायेवार यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून विचारणा केली असता शालेय पोषण आहारात पुरविल्या जाणारे सर्वच धान्य हे बर्याच वेळा निकृष्ठ व दर्जाहीन पुरविल्या जात असून, विद्यार्थ्यांना तो खाऊ घालण्याचीही इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे मध्यान्न भोजन देणे बंधनकारक असल्याने निकृष्ठ दर्जाचे धान्य स्वच्छ व नीटनेटके करून आहार दिला जातो. सवना जं शाळेत एकूण २७२ विद्यार्थी संख्या असून, आज पुरविण्यात आलेला ११ कुंटल तांदुळापैकी एक कट्टा गाडीतून उतरताना फुटल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुरविण्यात आलेल्या धान्यापैकी किती धान्य निकृष्ठ आहे हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.

गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, पुरविण्यात आलेले धान्य निकृष्ठ असल्याचा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परत करायला हवे. असा माल शाळेने घेणे बंधनकारक नसल्याचे ते म्हणाले.

रविवार, 22 फ़रवरी 2015

ज्ञानेश्र्वरी पारायणाची सांगता

दिप प्रज्वलन, शोभा यात्रा व काल्याच्या किर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायणाची सांगता.... 


नांदेड(खास प्रतिनिधी)मागील आठ दिवसापासुन हिमायतनगर येथे सुरु असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळयाची सांगता रविवारी दि.२२ रोजी ग्राम दिंडी व हभप.अशोक महाराज तळणीकर यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. यावेळी किर्तनाला ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्यावर श्री भक्तांचा जनसागर लोटला होता.


गत आठ दिवसापासून सुरु असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी रात्रीला ओम आकारातील दिव्याची ज्योत लाऊन मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वल करण्यात आले. यावेळी संपुर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या उजेडाने उजळुन निघाला होता. तसेच हरिणाम सप्ताहच्या समाप्तीनीमीत्त सकाळी ९ वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी प्रथम ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य माऊली ज्ञानेश्र्वर महाराज बोरगडीकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. शोभा यात्रेत महीलां, मुलींनी डोक्यावर ज्ञानेश्र्वरी ग्रंथ व तुलसी वृंदावण घेऊन सामील झाल्या होत्या. तसेच टाळ मृदंगाच्या गजरात श्री परमेश्र्वर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी ताल धरुन शहरवासीयांना आकर्षीत केले. सदर शोभा यात्रा परत श्री परमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने समारोप करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णाची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन बैंडबाज्याच्या गजरात काढण्यात आली होती. यावेळी परमेश्र्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्र्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शींदे, विठलराव वानखेडे, आनंता देवकते,  राजाराम बलपेलवाड, माधवराव पाळजकर, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, संजय माने, गजानन चायल, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, कानबा पोपलवार, अनिल भोरे, प्रकाश साभळकर, रामराव सुर्यवंशी, बाबुराव पालवे, देवराव वाडेकर, यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला - पुरुष बहु संख्येने उपस्थीत होते. 

दहीहंडीच्या दिवसापासुन परमेश्वर यात्रा उत्सवात रंगत भरली असुन, मंदिराच्या कमानीसह कळसावर विद्दुत रोषनाई केल्याने व परिसरात आकाश पाळने, घोडागाडी, मौत का कुआ यासह विवीध प्रकारच्या मीठाई व जीलेबीची दुकाने थाटल्यामुळे यात्रा उत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात झाली आहे. दि.२३पासुन मंदिरातर्फे आयेजीत खेळ, भाषन, भजन, रांगोळी, सुदृढ बालक व पशुप्रदर्शन, कब्बडी व कुस्ती स्पर्धाच्या कार्यक्रमाचे रेलचल चालणार आहे. 

शनिवार, 21 फ़रवरी 2015

खंडोबाची प्राणप्रतिष्ठापना

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील श्री परमेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या श्री खंडोबाची मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना मंदिरातील आवारात करण्यात आली आहे. यावेळी येळकोट...येळकोट... जय मल्हारच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता.

शेकडो भक्तांच्या साक्षीने खंडोबाच्या मूर्तीला उचलून परमेश्वर मंदिराच्या आवारात आणण्यात आले. मंदिर परिसरातील गणपतीच्या मूर्तीच्या बाजूच्या जागेत ओटा बनवून पुरोहित कांता गुरु यांच्या मधुर वाणीत सौ लक्ष्मीबाई शंकर कदम या दाम्पत्यांच्या हस्ते मूर्तीला पंचामृत व गंगाजलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हळदीने महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित युवकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोष केला. याप्रसंगी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्र्वर चिंतावार, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, प्रकाश शींदे, विठलराव वानखेडे, आनंता देवकते, प्रकाश कोमावार, संभाजी जाधव, राजाराम बलपेलवाड, वामनराव बनसोडे, माधवराव पाळजकर, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, शाम पवनेकर, सौ.लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, सौ.लताबाई पाध्ये, परमेश्वर उत्तरवार, गजानन वारकड, श्री संगन्वार, श्री काळे, राम सूर्यवंशी, सचिन माने, विजय शिंदे, संजय माने, गजानन चायल, रामराव सुर्यवंशी, किशनराव अनगुलवार, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, अनिल भोरे, प्रकाश साभळकर, देवराव वाडेकर, यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला - पुरुष बहु संख्येने उपस्थीत होते.

तलाठ्यांचा दुष्काळी याद्यात घोळ....

आन्देगाव सज्जाच्या तलाठ्याने बागायती क्षेत्र जिरायती दाखविले

हिमायतनगर(वार्ताहर)दुष्काळाने सर्व पिके हातची गमावलेल्या शेतकर्यांना शासनाने मदतीचा हात पुढे केला असला तरी, तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने मात्र शेतकऱ्यांच्या आपेक्षेवर पाणी फेरले असून, महिना महिना गावाकडे न फिरकणाऱ्या तलाठ्यांनी बागायती क्षेत्राऐवजी जिरायती क्षेत्र दाखविल्याने अनेक नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांचे तलाठ्यांच्या मनमानीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यातच आन्देगाव सज्जाचे तलाठी मनोज देवने यांनी दुष्काळ ग्रस्त क्षेत्राची पाहणी न करता सरसकट बागायती क्षेत्र जिरायत क्षेत्र दाखविल्याने अनेक शेतकर्यांनी दवानेच्या मनमानी कारभार विषयी संताप व्यक्त केला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या गहरी संकटात सापडला असताना  शासनाने शेतकर्यांना भरघोस मदत करण्याची अपेक्षा शेतकऱ्याकडून केली जात होती. शासनाने मदतीचा हात पुढे करत मदत जाहीर केली, बागायती आणि जिरायती क्षेत्रासाठी वेगवेगळी मदत देवू करून दिलासा दिला. यात बागायती क्षेत्रातील उस, केली, हळद आदि पिके लागवडी खालील हिम्यात्नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असताना येथील तलाठ्यांनी मात्र असे बागायती क्षेत्रा कोरडवाहू दाखविले असल्याने अनेक बागायतदार शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिला आहे. आन्देगाव सज्जा अंतर्गत आन्देगाव, टेंभी, पार्डी आदी गावात बागायती क्षेत्रा बर्यापैकी असतानाही तलाठी मनोज देवने यांनी जयमोक्यावर न जात हिमायतनगर स्थित असलेल्या तलाठी कार्यालयात बसून, दुष्काळ चित्राच्या याद्या बनविल्या आहेत. परिणामी बागायतदार शेतकरी पाण्याखालील पिके दुष्काळात गमावूनही शासनच्या मदतीपासून वंचित राहिला आहे. देवानेच्या या प्रतापाचा अनेक बागायतदार शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

तलाठी सज्ज्याचे कार्यालय हिमायतनगरलाच
-----------------
हिमायतनगर तालुक्यातील अनेक तलाठी हे नांदेड, भोकर, किनवट आदी ठिकाणाहून ये - जा करीत असल्याने नेमून दिलेल्या सज्ज्यातील गावाकडे जाण्या ऐवजी रेल्वेने हिमायतनगर येथेच उतरून शहरात उघडलेल्या भाड्याच्या रुममध्ये कार्यालय थाटून गावांचे सर्वे आणि अन्य कामकाज येथे बसूनच करत असल्याने याचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. तलाठ्यांच्या या मनमानी कारभाराकडे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष देवून हिमायतनगर शहरात थाटलेले अनेक तलाठी साज्जाची कार्यालये मूळ सज्जावर स्थापण्याविषयीची कार्यवाही करावी. आणि हिमायतनगर शहरातील तलाठ्यांची कार्यालये बंद करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्या प्रकरणी त्या त्या  तलाठ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा अशी रास्त अपेक्षा शेतकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केली आहे.     

पाण्यासाठी भटकंतीहिमायतनगर(अनिल भोरे)उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहर व तालुका परिसरात चारा व पाणी टंचाईच्या तीव्र झाला बसण्यास सुरुवात झाली असून, पावसाळ्यात झाली कमी पर्जन्यमानामुळे नदी नाले सप्टेंबर - अक्टोबर मधेच कोरडेठाक पडल्याने मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वन - वन भटकूनही चारा व पाणी मिळत नसल्यामुळे डबक्यातील जमा झालेल्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, दुष्काळाने होरपळलेल्या हिमायतनगर तालुक्याला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई उग्ररूप धारण केले असून, हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकावर आली आहे. प्रशासनाने मंजूर केलेला कृती आराखडा सध्या प्रशासकीय चाक्रव्युव्हातून वाटचाल करत असल्याने टंचाईत मंजूर केलेला आराखडा टंचाई संपल्यावर प्रत्यक्षात राबविला जाणार काय..? असा प्रतिप्रश्न नागरिक विचारीत आहेत. 

मनुष्यप्राणी तहान भागविण्यासाठी हंडाभर पाणी कसेतरी उपलब्ध करेल, परंतु मुक्या प्राण्यांचे काय..? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. परिणामी चारा - पाण्याच्या चिंतेने अनेक पशुपालाकानी लाख मोलाची पशुधन आठवडी बाजारात आणून कवडी -मोल दराने विक्रीसाठी आणता असल्याचे विदारक चित्र सध्या तरी दिसून येत आहे. राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात जनारावाना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सिमेंटच्या हैदाचे टाकी देण्यात आली. परंतु हौदात गात तीन वर्षापासून एक थेंबभर पाणीसुद्धा साठविल्या गेले नसल्याने मुक्या प्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करीत घन पाण्यावर घसा ओला करावा लागत आहे. परिणामी मुक्या प्राण्यांना साथ रोगाच्या आजारला बळी पडण्याची वेळ आली असून, याकडे संबंधितानी लक्ष देवून तातडीने पुरविण्यात आलेल्या हौदात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व खाण्यासाठी चारा डेपोची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. 

पाईप लाईन फुटल्याने टंचाईच्या झळा
एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसत असताना शहराला पाणी पुरवठा केल्या जाणारी नळ योजनेची पाईप लाईन नडव्याच्या पुलाजवळ गात दोन महिन्यापासून फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याची माहिती संबंधिताना असताना देखील ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पुढार्याकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शहर वासियातून केला जात आहे. 

मंगलवार, 17 फ़रवरी 2015

आजी - माजी आमदारांनी दिल्या शुभेच्छा

महाशिवरात्री निमित्त शिवपर्व २०१५ चे थाटात प्रकाशन

हिमायतनगर(गोविंद गोडसेलवार)महाशीवरात्रीनीमीत्त नांदेड न्युज लाइव्हने साकारलेल्या शिवपर्व २०१५ या विशेषांकाचे प्रकाशन आ.नागेश पाटील व माधवराव पाटील यांच्या हस्ते दोन सत्रात करण्यात आले आहे. याप्रसंगी जुन्या- जानकार मंडळी तथा मान्यवरांनी प्रकाशीत केलेल्या अंकाचे भर-भरुन कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

हिमायतनगर शहर व तालुक्यातील दुर्लक्षित प्राचीन मंदिरे आणि नांदेड जिल्ह्यातील इतिहास कालीन किल्ले, प्रेक्षणीय ठिकाणे, आदींची संक्षिप्त मागोवा घेण्याच्या उद्देशाने भास्कर दुसे यांच्या संपादनाखाली नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांनी साकारलेल्या शिवपर्व २०१५ या विशेषांकात पर्यावरण, स्वच्छतेची चळवळ आदी विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर, तीर्थक्षेत्राचे शिल्पकार तथा माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, सरसम गटाचे जी.प.सदस्य सुभाष राठोड, मंचावर वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे, तहसीलदार शरद झाडके, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, यात्रा कमेटीचे अध्यक्ष  लक्ष्मणराव शक्करगे, जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, उपसरपंच म.जावेद अ.गन्नि, विकास पाटील, जनार्धन ताडेवाड, लक्ष्मण हेंद्रे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी शिवपर्व विशेषांकाची दर्जेदार मांडणी, सुबक छापी, व विस्तृत माहितीचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल संपादक अनिल मादसवार, कानबा पोपलवार, अनिल भोरे यांचे आजी - माजी आमदारांची कौतुक करून शाब्बासकीची थाप दिली. तसेच अनेक मान्यवर पुढारी, अधिकारी व पत्रकारांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

माजी गृहमंत्र्यांना श्रद्धांजली 

शिवपर्व २०१५ च्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना भावपूर्व श्रद्धांजली वाहिली. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ग्रामीण साहित्यिक मारोती वाघमारे, बाळू अण्णा चवरे, वनपाल शिंदे, डॉ.राजेंद्र वानखेडे, सुरेश पळशीकर, प्रवीण जन्नावार, मंदिराचे संचालक शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा,राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपीक बाबुरावजी भोयर, विजय शिंदे, राजु गाजेवार, रामराव सुर्यवंशी, परमेश्वर पानपटे, सुभाष शिंदे, देवय्या गौड, दिलीप लोहारेकर, प्रभाकर मुधोळकर, अक्कलवाड गुरुजी, गणेश शिंदे, संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे, शाम जक्कलवाड, प्रकाश साबळकर, एड.दिलीप राठोड, एड.जाधव, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोविंद बंडेवार, फेरोजखान युसुफ खान, संदिप तुप्तेवार, हानुसिंग ठाकुर, उदय देशपांडे, नामदेव उप्पलवाड, यांच्यासह अनेक ग्रामस्थ, नागरिक दर्शनार्थी भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्याक्रमचे सुरेख सूत्रसंचालन लोकमतचे पत्रकार अशोक अनगुलवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कानबा पोपलवार यांनी मानले. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, बी.आर.पवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, गोविंद गोडसेलवार, शुद्धोधन हनवते, धम्मा मुनेश्वर, परमेश्वर शिंदे, असद मौलाना, गजानन चायल, अ फाहद खान, शे.इस्माईल, रामदास रामदिनवार, ज्ञानेश्वर गोडसेलवार, सुभाष कांबळे, अमोल कोटूरवार, देवराव वाडेकर, मारोती वाघमारे, रामू नरवाडे, विजय दळवी, उत्कर्ष मादसवार तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते युवकांनी परीश्रम केले.  

श्रीचे दर्शन

महाशीवरात्रीच्या पर्वावर लाखो भावीकांनी घेतले
श्रीचे दर्शन

हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर नवसाला पावनारा म्हणुन संबध जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.१७ मंगळवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- तेलंगाना, आंध्रप्रदेशातील भक्तांनी घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. शहरात सर्वत्र भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखो भावीक भक्तांनी मध्यरात्री १२ च्या नंतर दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने विषेश सुवीधा, चहा- फराळ पाण्याची सोय केली होती. 

महाशिवरात्री नीमीत्ताने मंदिराच्या कळसाच्या, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली. श्री दर्शनासाठी वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह बैलगाडी, जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भक्तांचे लोंढेच्या - लोंढे दाखल झाले होते. शहरात सवर्त्र भक्तीमय वातावरण निमार्ण झाले असुन, महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु - पदार्थाची सजलेली दुकाने व भक्तांच्या अफाट गर्दीमुळे यात्रेला रंग चढु लागल्याने चित्र दिसुन आहेे. महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन 3 वेळा श्री चे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुने जानकार सांगतात. 


महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थीत होऊन, श्रीचे दर्शन घेतले. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.जालंधर महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव - पावर्तीचा अभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न झाला. मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्षांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न झाली. श्रीच्या मुर्तीला अलंकार विभुषीत केल्यानंतर दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त ठेवन्यात येतो. यावेळी अलंकार विभुशीत श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंच्या उपस्थीतीत चढवीण्यात आली आहेत. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर ,उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव राजेश्वर चिंतावार,सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा,राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर, गावकरी मंडळी उपस्थीत होते. 

शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड - बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे लावले जाऊन पुजा- अचर्ना करण्यात येऊन श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ,मराठवाडा, कर्नाटक , आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक परमजितिसंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. 


शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी श्रीचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्या हस्ते शहर व परीसराच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे भूमिपूजन केल्या गेले. यावेळी मंदिरात उपस्थित भावीक-भक्त व नागरीकांना संबोधीत करतांना ते म्हणले की जनतेच्या आर्शीवादानेच विकास कामाचा धडका सुरु असुन, अश्याच प्रकारे जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील्यास हिमायतनगर तालुक्यातील तमाम देवी - देवतांच्या मंदिराबरोबर गाव- वाडी- तांडे- शहराचा कायापालट करण्याठी सदैव प्रयत्नशील राहील. तसेच गुत्तेदारानेही विकास कामात पारदर्शकता ठेऊनच कमे करावी अन्यथा त्याची गय केली जाणार नसल्याचे सांगून कामाचा दर्जा वाढवीण्याच्या सुचना दिल्या.

महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर परमेश्वर मंदिर परिसर भक्तांच्या गर्दी व बेल, फुल, प्रसादाच्या स्टोलने परिसर फुलाला, मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी फराळ, चहा, पाण्याची सोय करण्यात आली. यावेळी भाविकांनी रांगा लावून मनोभावे दर्शन घेवून डोळ्याचे पारणे फेडले. 

रविवार, 15 फ़रवरी 2015

यात्रा महोत्सवाला सुरुवात

हिमायतनगर(वार्ताहर)महाशिवरात्री निमित्त आयोजित येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या भव्य यात्रा महोत्सवाला ज्ञानेश्वरी व विना पारायण सोहळ्याने सुरुवात झाली आहे.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान शंकराच्या अवतारातील उभी असलेल्या श्री परमेश्वरची सगुणरूप मूर्ती याच पर्व काळात शेती नागरताना एका शेतकऱ्याला सापडली होती. तेंव्हा या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रौत्सव साजरा केला जातो. जवळपास पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. माघ कृ.११ दि.१५ रविवारपासून यात्रेला अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सुरुवात झाली आहे. ग्रंथराज पारायणाचे व्यासपीठ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर यांनी सांभाळले असून, त्यांच्या मधुर वाणीत ग्रंथाचे पठण केले जात आहे. पहिल्याचा दिवशी शहरातील शेकडो महिला, पुरुष व बालभक्तानी ज्ञानेश्वरी परायणात सहभाग घेतला असल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यात सामील झालेल्या परायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला आहे. यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन, तसेच केदार जगदगुरु यांचा इष्टलिंग महापूजा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या मध्यरात्री श्रीच्या मूर्तीचा अलंकार सोहळा मंत्रोच्चारात केला जाणार आहे. त्यानंतर विविध स्पर्धा, प्रदर्शन व खेळाचे आयोजन करण्यात आले असून, या पर्व काळात सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

छायाचित्राचे प्रकाशनहिमायतनगर(वार्ताहर)श्री परमेश्वराचे सुबक छायाचित्र असलेले कैलेंडरचे यात्रेच्या पहिल्या दिवशीचा मुहूर्त साधून मंदिर संस्थांच्या संचालक मंडळाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे. दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना छायाचित्र भेट दिली जात असल्याचे मंदिर कमेटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आदी दूर-दूरच्या राज्यातील भक्तगण दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात. श्री दर्शनासाठी येणाऱ्या त्या सर्व भक्तांना प्रसादाबरोबर परमेश्वराचे सुबक छायाचित्र भेट देण्यात येते. यावर्षी नव्याने छापण्यात आलेल्या छायाचित्राचे दि.१५ रोजी मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी लक्ष्मण शक्करगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ संचालक भास्कर दुसे, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, माधवराव पाळजकर, किशनराव मादसवार, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, मुलचंद पिंचा, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपीक बाबुरावजी भोयर, पत्रकार अनिल मादसवार, हनुसिंग ठाकूर, रामदास रामदिनवार, यांच्यासह शेकडो नागरिक, भक्त व परायणार्थी उपस्थित होते.

शंकरपट रद्द

परमेश्वर यात्रेतील शंकरपट स्पर्धा व भीमाशंकरलिंग यांचे कार्यक्रम रद्द


हिमायतनगर(वार्ताहर)वाढोणा नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त भरविण्यात येणाऱ्या शंकर पट, स्पर्धा व जगदगुरु भीमाशंकरलिंग स्वामी शिवाचार्य यांचे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. 

परमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात कार्यक्रम पत्रिकेत २८ फेब्रुवारी रोजी शंकरपट स्पर्धा व ०१ मार्च रोजी शंकरपटाचा अंतिम सामना हे नियोजित कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. परंतु यावर मा. सर्वोच्च न्यायालय यांचा दि.०७ मे २०१४ च्या आदेशान्वये प्राण्यांच्या व पक्षांच्या शर्यतीवर पूर्णपणे बंदी घातल्याने शंकरपट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. तसेच केदार पीठाचे जगदगुरु श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग स्वामी शिवाचार्य यांचे सर्व कार्यक्रम त्यांच्या वैक्तिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वये परमेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी कळविले आहे. याची नोंद सर्व भाविक भक्त व शान्कात पट शौकीनांनी घ्यावी असे आवाहन परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.

मानव जातीच्या कल्याणासाठी

हिमायतनगर(वार्ताहर)सिद्धार्थ गौतम बुद्धाने जगाला दिलेला करुणेचा धम्म हा समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी असून, तो सदाचार व शील शिकवितो. असे प्रतिपादन भदंत शीलबोधी पुणे यांनी हिमायतनगर येथे आयोजित बौद्ध संस्कार उपासिका महिला धम्म परिषदेतील उपस्थितांना धम्म देसना देताना केले.

हिमायतनगर शहरातील लुम्बिनी बुद्द विहार आंबेडकर नगर येथे दि.१४ आणि १५ फेब्रुवारी या दोन दिवशीय साधना व धम्म देसना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सिद्धार्थ गौतम बुद्धाने सांगितलेल्या प्रज्ञा, शील, करुणेचा अंगीकार करून जीवन व्यतीत केल्यास मानवी जीवनाचे कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही. मोह, माया, मत्सर, ह्या गोष्टींचा त्याग करणारा माणूसच जीवांचे कल्याण करून घेण्यासाठी पात्र असून, समाजातील अनिष्ठ रूढी, चालीरीती, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा या गोष्टीना तिलांजली देवून धम्म अंगीकार करण्याचा उपदेशही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी पुज्य भदंत प्रज्ञापाल महाथेरो, भदंत शिलानंद, भदंत उपाली, भदंत आनंद बोधी, भदंत बी.अश्वजीत, आदी पूज्यनीय भिक्कूगण उपस्थित होते. या कार्यक्रमास शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला उपासिका उपस्थित झाल्या होत्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वितेसाठी पुज्य भदंत सारीपुत यांनी परिश्रम घेतले. 

शनिवार, 14 फ़रवरी 2015

गुन्हा दाखलहिमायतनगर(वार्ताहर)सासरवाडीवाल्यांच्या धमकीमुळे राजु डुकरेनी विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना दि.१२ रोजी घडली आहे. मयत उवाकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात पाच जणांवर मरणास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मौजे वाळकेवाडी शिवार येथे, आरोपी (1) गंगाराम फकिरा गुंंजेवाड (2) गुरप्पा नरसिंग गायकवाड (3) रेडी गुरप्पा गायकवाड (4) पापया नरसिंग गायकवाड (5) दशरथ पापया गायकवाड (6) बाबु नरसिंग गायकवाड, सर्व राहणार वाळकेवाडी ता. हिमायतनगर यांनी संगणमत करुन मयत राजु कानबा डुकरे, वय 25 वर्षे याचे पत्नीस न पाठवता मयतास शिवीगाळ केली. तसेच परत मुलीला घेण्यास आल्यास खतम करतो अशी धमकी दिली. मयत याने यातील आरोपीच्या त्रासाला व धमकीला कंटाळुन विषारी औषध पिवुन आत्महत्या केली अशी फिर्यादी कानबा यलप्पा डुकरे, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार वाळकेवाडी यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम 306, 504, 506, 34 भादविप्रमाणे वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोउपनि चव्हाण हे करीत आहेत.

तहसीलदारांचे अर्थपूर्ण दुर्लक्षहिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील नदी, नाल्याच्या काठावर तसेच माळरानातून गौण खनिजाचे उत्खनन सर्रास सुरूच असून, याकडे स्थानिकाच्या तहसीलदाराचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे.

याबाबत सविस्तर असे कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून व नाल्यावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्यासंबंधी अनेक वर्तमान पत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. याची दाखल घेत बोटावर मोजण्या इतकी तस्करावर कार्यवाही केल्याचा दिखावा करत जानेवारी महिन्यात केवळ सहा जनन दंड आकाराला. परंतु अजूनही पैनगंगा नदीवरून चोर्या मार्गाने रेतीचा उपसा चालूच असून, प्रशासनातील महसुल विभागाचा कारभार पाहणारे तलाठी, प्रभारी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील जबादार अधिकारी अर्थपूर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नदीकाठावरील गावकरी करीत आहेत.

तहसिलदाराच्या उदासीन धोरणामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असून, रेती तस्करांशी अधिकाऱ्यांचे साठेलोटे असल्याचेही नागरिक सांगतात. नदीकाठावरील पळसपूर, घारापुर, डोल्हारी, रेणापूर(बेचिराग) वारंगटाकळी, कामारी, एकम्बा, धानोरा, टेंभी(मासोबा नाला) आदीसह अन्य ठिकाणावरून रेतीचा सर्रास उपसा केला जात आहे. यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे. वरिष्ठ स्तरावरून निष्क्रिय तहसीलदार व साते लोटे करणारे मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.