आबासाहेब चौरे रुजू

हिमायतनगर येथे तहसीलदार म्हणून आबासाहेब चौरे रुजू 

हिमायतनगर(वार्ताहर)येथील तहसीलदार जराड यांची बदली झाली असून, त्यांच्या ठिकाणी नवनिर्वाचित तहसीलदार म्हणून श्री आबासाहेब चौरे यांनी आज दि.१३ रोजी पदभार स्वीकारला आहे.

येथील तहसीलदार अरुण जराड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर हिंगोली येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेले श्री आबासाहेब ज्ञानदेव चौरे यांची हिमायतनगरचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी यापूर्वी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम पहिले होते. त्यावेळी त्यांची बदली तुळजापूर येथे पदोन्नतीने झाली होती. त्यानंतर हिंगोलीचा काय्भर सांभाळून पुनश्च ते हिमायतनगर येथे तालुका दंडाधिकारी पदावर रुजू झाले आहेत. येथील प्रशासकीय कामाचा त्यांना दीर्घ अनुभव असून, ते येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आग्रही राहतील. त्यामुळे रुजू होतच त्यांचे स्वागत करण्यासाठी ब भेट घेण्यासाठी नागरिक, नेते मंडळी व पत्रकार उपस्थित झाले होते. यावेळी पुरवठा अधिकारी श्री मुंडे, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव अनिल मादसवार, माजी अध्यक्ष कानबा पोपलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, संजय मुनेश्वर, वसंत राठोड, साहेबराव नरवाडे, रमेश सरपे, छायाचित्रकार माधव यमजलवाड, सोपान बोम्पीलवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी